BMW सोबत स्टंट करणं महागात, दुचाकीवरील तरुण-तरुणी झाले रक्तबंबाळ, मुंबईतील विचित्र घटना

Last Updated:

BMW Car-Bike Accident : मुंबईतील बोरिवली पश्चिम परिसरात अपघाताची एक विचित्र घटना समोर आली आहे. बीएमडब्ल्यू कारसोबत स्टंट करणं एका तरुण-तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे.

News18
News18
विजय वंजारा, प्रतिनिधी मुंबई: मुंबईतील बोरिवली पश्चिम परिसरात अपघाताची एक विचित्र घटना समोर आली आहे. बीएमडब्ल्यू कारसोबत स्टंट करणं एका तरुण-तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. बीएमडब्ल्यू कारसोबत स्टंट करताना स्कूटरवरील कपलचा अपघात झाला आहे. या अपघातात दोघंही गंभीर जखमी झाले आहेत. एवढंच नव्हे तर या स्टंटबाजी दरम्यान बीएमडब्ल्यूला देखील अपघात झाला असून ही कार तारेचं कम्पाऊंड तोडून थेट झाडीत घुसली आहे. याबाबतचे काही फोटोज आणि व्हिडीओज समोर आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना मुंबईच्या बोरिवली पश्चिम परिसरातील एलआयसी कॉलनी येथील शांती आश्रम बस डेपोजवळ घडली. इथे स्कूटरवरून आलेल्या एका तरुणाने आणि तरुणीने बीएमडब्ल्यू कारसोबत स्टंट करण्याचा प्रयत्न केला. पण स्कूटीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वार मुलगा आणि मुलगी यांचा अपघात झाला. दोघंही गंभीर जखमी झाले.
स्टंटबाजी करणाऱ्या तरुण आणि तरुणीच्या अंगावर अनेक ठिकाणी ओरखडलं असून डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दोघांना जखमी अवस्थेत जवळच्या करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर बीएमडब्ल्यू कार रस्ता सोडून एलआयसी कॉलनीच्या हद्दीत घुसली आहे. या अपघातात स्कूटी आणि बीएमडब्ल्यू कारचं मोठं नुकसान झालं आहे. स्कूटी आणि कारचा समोरील भाग तुटला आहे.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच एमएचबी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. हा अपघात नेमका कसा घडला? कुणाची चूक होती, याचा तपास पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
BMW सोबत स्टंट करणं महागात, दुचाकीवरील तरुण-तरुणी झाले रक्तबंबाळ, मुंबईतील विचित्र घटना
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement