Untouchability : 'आम्हाला राजकारणातही अस्पृश्य..' प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल

Last Updated:

Untouchability In Politics : राजकारणात अस्पृश्यता पाळत असल्याची घणाघाती टीका, वंचित बहुजन आघाडी नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल
प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल
मुंबई, 8 सप्टेंबर (चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी) : काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचं निमंत्रण अनेक विरोधी पक्षांना देण्यात आलं होतं. पण राज्यातील वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत प्रकाश आंबेडकर यांची मैत्री आहे. यावरुन आता स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आंबेडकरांनी आपली भूमिका मांडली आहे.
"आम्हाला फक्तं समाजातच अस्पृश्य म्हणून वागवलं जात नाही, तर राजकारणातही अस्पृश्य म्हणूनच वागवलं जातं. भाजप-आरएसएसच्या राजकारणाचा प्रभाव वाढल्यापासून सनातन धर्म मानणारे आणि त्याचे प्रचारक असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही राजकारणात अस्पृश्यता पाळायला लागले आहेत." अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
advertisement
भाजप विरोधी पक्षांची मोट बांधत #INDIAAlliance ची निर्मिती करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या आघाडीत सामील करून घेण्याच्या निमंत्रणावरून वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे. नुकतीच मुंबईत #INDIAAlliance ची बैठक पार पडली. महाराष्ट्रातील भाजप विरोधी पक्षांना या बैठकीचे निमंत्रण पाठविण्यात आले होते. मात्र, सातत्याने भाजप-आरएसएस विरोधी भूमिका घेणाऱ्या आणि राज्यातील महत्त्वाचा पक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीला मात्र मात्र या बैठकीचे निमंत्रण पाठविण्यात आले नव्हते.
advertisement
आंबेडकरांचा काँग्रेसला सवाल
यासंदर्भात काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना पत्रकारांनी विचारले असता ,"निमंत्रण पाठवायला #INDIAAlliance ची बैठक काय सत्यनारायणाची पूजा नाहीये." असे उत्तर त्यांनी दिले. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट मध्ये "#IndiaAlliance मध्ये येण्यासाठी निमंत्रणाची गरज नव्हती, तर इतर पक्षांना निमंत्रणे का वाटत फिरत होतात?" असा थेट सवाल काँग्रेसला विचारला आहे.
advertisement
तसेच "लालू प्रसाद यादव आणि स्टॅलिन या शूद्रांमधल्या मोठ्या समाजवादी नेत्यांशिवाय तुमच्या आघाडीची गाडी अडली नसती, तर त्यांना तुम्ही निमंत्रण दिले असते का याबद्दल मला शंकाच आहे." असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
मराठी बातम्या/मुंबई/
Untouchability : 'आम्हाला राजकारणातही अस्पृश्य..' प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement