Vasai Virar Election 2026 : मतदानाला 4 दिवस उरले अन् वसई-विरारमध्ये 137 जणांची उमेदवारी धोक्यात? नेमकं चाललंय काय?

Last Updated:

वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकला असून या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या १३७ जणांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

vasai virar municipal election 2026
vasai virar municipal election 2026
Vasai Virar Municipal Election 2026 : वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकला असून या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या १३७ जणांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यातील काही उमदेवारांनी अर्ज भरताना दाखल केलेल्या शपथपत्रावर स्वाक्षरीच केलेली नाही. याविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हे सगळे आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावले आहेत.
वसई विरार महापालिकेच्या निवडणूकीच्या रिंगणात ५४७ उमेदवार आहेत. उमेदवारांनी अर्जाबरोबर प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक होते. मात्र यापैकी १३७ उमेदवारांनी शपथपत्रावर स्वाक्षरी केली नसल्याची बाब समोर आली आहे. त्यात भाजपा शिवसेनाचे ६५, उबाठाचे ४० आणि काँग्रेसच्या ४ उमेदवारांचा समावेश आहे. प्रतिज्ञापत्र हा शपथेवर दिलेला दस्तऐवज असतो. सही नसल्यास त्या प्रतिज्ञापत्रातील मजकुराची सत्यता उमेदवाराने मान्य केलेली नाही, असे कायद्याने गृहीत धरले जाते. त्यामुळे असे प्रतिज्ञापत्र दोषपूर्ण व कायद्याच्या दृष्टीने अवैध ठरते, असा आरोप ॲड प्रवीण पाटील यांनी केला आहे.
advertisement
पालिका आयु्क्त मनोजकुमार सुर्यवंशी यांनी हे आरोप फेटाळले आहेत. प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी नाही अशी तक्रार कुणी केली नव्हती. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी जेव्हा अर्ज उपलब्ध करून दिले होते तेव्हा कुणी हरकत घेतली नव्हती असे आयुक्तांनी सांगितले. उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र नोटरी करून सांक्षाकीत करण्यात आले आहे तसेच शपथपत्र निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी स्विकारून नामनिर्देशीत केलेली आहेत आहेत, असेही आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
advertisement
एकूण प्रभाग - 95 एकूण जागा - 115 एकूण उमेदवार - 547
पक्षनिहाय उमेदवार संख्या
बहुजन विकास आघाडी - 105भाजप - 87शिवसेना (शिंदे) - 27राष्ट्रवादी (अजित पवार) - 15मनसे -2 (बविआ सोबत, शिटी चिन्हावर निवडणूक लढणार)काँग्रेस - 10शिवसेना (उद्धव ठाकरे) - 89राष्ट्रवादी (शरद पवार) -00वंचित बहुजन आघाडी - 11बसपा - 15MIM - ०३श्रमजीवी संघटना - ०५ (भाजपासोबत)आगरी सेना - ०१ (भाजपासोबत)अपक्ष - १७७
advertisement
आरक्षण
सध्या वसई विरार महापालिकेत 29 प्रभाग असून 115 सदस्य संख्या आहे. यापैकी 58 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर 57 जागा पुरुषांसाठी राखीव आहेत. अनुसुचित जाती ( SC) आणि अनुसूचित जमाती (ST) साठी प्रत्येकी 5 आरक्षण आहेत. तर यात प्रत्येकी 2 महिलांसाठी आरक्षण ठेवण्यात आले आहेत. तसेच 74 जागा या सर्वसाधारण प्रवर्गाकरीत राखीव ठेवण्यात आला आहे.
advertisement
वसई विरार महापालिकेचा पक्षनिहाय निकाल
बहुजन विकास आघाडी : 106
भाजपा : 1
काँग्रेस : 0
राष्ट्रवादी काँग्रेस : 0
शिवसेना : 5
इतर/अपक्ष : 3
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Vasai Virar Election 2026 : मतदानाला 4 दिवस उरले अन् वसई-विरारमध्ये 137 जणांची उमेदवारी धोक्यात? नेमकं चाललंय काय?
Next Article
advertisement
Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement