Bhaskar Jadhav : भास्कर जाधव झाले भावुक; उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का? कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून मोठी बातमी समोर
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
भास्कर जाधव यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात ते चांगलेच भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
रत्नागिरी, स्वप्नील घग, प्रतिनिधी : आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे. दरम्यान त्यांनी दोन दिवसांपूर्वी या मेळाव्यासंदर्भात आपल्या कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलं होतं. त्यानंतर भास्कर जाधव हे पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना भास्कर जाधव यांच्या नाराजीबाबत त्यांचे चिरंजीव विक्रांत जाधव यांनी मोठा खुलासा केला आहे.
नेमकं काय म्हणाले विक्रांत जाधव?
'मी प्रसार माध्यमांना विनंती करतो की, कुठल्यातरी पत्राचा आधार घेऊन निराधार बातम्या देऊ नका. चुकीच्या बातम्या येतात तेव्हा आम्हालाही त्रास होतो, कुटुंबाला त्रास होतो. आम्ही कुठेही जाणार नाहीत. भास्कर जाधव यांच्याबद्दल माध्यमात ज्या बातम्या सुरू आहेत, त्या सर्व निराधार आहेत. केवळ पत्राचा आधार घेऊ चुकीच्या बातम्या चालवल्या जात आहेत. भास्कर जाधव उध्दव साहेबांची साथ सोडणार नाहीत,' असं विक्रात जाधव यांनी म्हटलं आहे. दरम्यान विक्रांत जाधव यांचं भाषण सुरू असताना भास्कर जाधव चांगलेच भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
advertisement
दरम्यान भास्कर जाधव हे शिवसेना उद्धव ठाकरे गटावर नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर त्यांना शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी खुली ऑफर दिली आहे. ‘भास्कर जाधव यांची जर तिकडे घुसमट होत असेल, तर त्यांनी शिवसेनेत यावे, त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल. त्यांना एकनाथ शिंदे न्याय देतील’ असं भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.
Location :
Ratnagiri,Ratnagiri,Maharashtra
First Published :
March 10, 2024 12:50 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Bhaskar Jadhav : भास्कर जाधव झाले भावुक; उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का? कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून मोठी बातमी समोर