Mumbai: घरात आई अन् काका, तरुणी दार वाजवत राहिली, आतलं दृश्य बघून शेजाऱ्यांचा उडाला थरकाप
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मुंबईच्या वडाळा परिसरात एका ४५ वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, मात्र यावेळी तिचा दीर केवळ प्रेक्षक बनून उभा होता.
मुंबई: माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना मुंबईच्या वडाळा परिसरातून समोर आली आहे. इथं एका ४५ वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, मात्र यावेळी तिचा दीर केवळ प्रेक्षक बनून उभा होता. त्याने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला नाहीच, उलट पीडित महिलेची मुलगी दरवाजा ठोठावत असताना त्याने तो उघडला देखील नाही. याप्रकरणी वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, वडाळ्याच्या प्रतीक्षानगर परिसरात एक दाम्पत्य आपल्या २५ वर्षीय मुलीसह वास्तव्यास आहे. गेल्या काही महिन्यांपासून या मुलीच्या वडिलांचा आत्येभाऊ (दीर) त्यांच्याच घरी राहत होता. शनिवारी मुलीचे वडील आणि मुलगी दोघेही कामावर गेले होते, त्यामुळे घरी केवळ आई आणि तिचा दीर दोघेच होते.
सायंकाळी मुलगी जेव्हा कामावरून घरी परतली, तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. तिने वारंवार दरवाजा ठोठावूनही आतमधून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. आरडाओरडा ऐकून शेजारीही मदतीला धावले, पण दीर दरवाजा उघडण्यास तयार नव्हता. "दरवाजा घट्ट बसला आहे, बाहेरून जोरात ढकला," असे सांगून तो वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत होता.
advertisement
अनैतिक संबंधांचा संशय
बराच वेळ गेल्यानंतर अखेर त्याने दरवाजा उघडला. मुलगी आत शिरली तेव्हा तिला समोरचे दृश्य पाहून धक्काच बसला. तिची आई विवस्त्र अवस्थेत गळफास लावलेल्या स्थितीत होती. आईला वाचवण्याऐवजी काका गप्प का बसला होता, असा प्रश्न मुलीनं विचारला. पण काकाला त्याचं उत्तर देता आलं नाही.
या घटनेनंतर पीडित मुलीनं आईचा मोबाईल तपासला असता, त्यातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. मृत महिला आणि तिच्या दिरामध्ये विवाहबाह्य संबंध असल्याचे काही चॅट्समधून स्पष्ट झालं. याच वादातून किंवा मानसिक त्रासातून महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
advertisement
पोलिसांची कारवाई
घटनेचे गांभीर्य ओळखून मुलीने तत्काळ वडाळा टीटी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आपल्या काकाविरुद्ध तक्रार दाखल केली. या घटनेमुळे संपूर्ण वडाळा परिसरात खळबळ उडाली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 11:42 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: घरात आई अन् काका, तरुणी दार वाजवत राहिली, आतलं दृश्य बघून शेजाऱ्यांचा उडाला थरकाप










