WR Mega Block : आज आणि उद्या पश्चिम रेल्वेवरील प्रवास टाळा; 240 लोकल फेऱ्या रद्द; वाचा वेळापत्रक

Last Updated:

Western Railway Block News : पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते बोरिवली दरम्यान सुरू असलेल्या मार्गिकेच्या कामामुळे आज आणि उद्या 240 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

News18
News18
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर कांदिवली ते बोरिवली दरम्यान सहावी मार्गिका टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी रेल्वे प्रशासनाने 30 दिवसांचा ब्लॉक घेतला असून त्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात लोकल फेऱ्या रद्द करण्यात येत आहेत. शुक्रवारी आणि शनिवारी रात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार असल्याने तब्बल 240 लोकल फेऱ्या रद्द राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
लोकलचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा
हे काम 20 डिसेंबर 2025 पासून सुरू झाले असून 18 जानेवारीपर्यंत चालणार आहे. या कालावधीत पश्चिम रेल्वेवरील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. लोकल सेवेसोबतच काही लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहेत. काही गाड्या उशिराने धावणार असून काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
'या' मार्गावर ब्लॉक, 'या' वेळेत काही लोकल फेऱ्या रद्द
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार आणि शनिवारी बोरिवली ते मालाड दरम्यान अप जलद मार्गावर रात्री 11.15 ते पहाटे 3.15 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. तसेच डाऊन जलद मार्गावर मध्यरात्री 1 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात पाचवा मार्ग बंद राहणार आहे. तसेच कामाच्या ठिकाणी वेगमर्यादा लागू करण्यात येणार असल्याने काही लोकल सेवा रद्द करण्यात येत आहेत. यामध्ये 12 आणि 15 डब्यांच्या लोकल तसेच वातानुकूलित लोकलचाही समावेश आहे.
advertisement
लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका
पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. भविष्यात लोकल फेऱ्या वाढवण्याच्या दृष्टीने वांद्रे टर्मिनस ते बोरिवली दरम्यान लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार केली जात आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांना स्वतंत्र मार्ग मिळेल आणि इतर मार्गिकांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
WR Mega Block : आज आणि उद्या पश्चिम रेल्वेवरील प्रवास टाळा; 240 लोकल फेऱ्या रद्द; वाचा वेळापत्रक
Next Article
advertisement
BMC Election: ठाकरे बंधू-भाजपमध्ये हातमिळवणी? निकालाआधीच विरोधी बाकांवरील नेत्याचा खळबळजनक दावा
ठाकरे बंधू-भाजपमध्ये हातमिळवणी? निकालाआधीच विरोधी बाकांवरील नेत्याचा खळबळजनक दाव
  • राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे.

  • ठाकरे बंधू आणि भाजपमध्ये पडद्याआड हातमिळवणीबाबत घडामोडी सुरू असल्याचा दावा

  • भाजप आणि ठाकरे बंधूंमध्ये साटेलोटे असल्याचा आरोप...

View All
advertisement