विशेष आहे कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व, अभ्यासकांनी सांगितली ही महत्त्वाची माहिती
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Priyanka Jagtap
Last Updated:
kojagiri pournima news 2024 - प्रत्येक वर्षी आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला कोजागिरी साजरी केली जाते. त्यामुळे या कोजागिरी पौर्णिमेचा योग आणि त्याचे महत्त्व काय आहे, हे जाणून घेऊयात.
प्रियांका जगताप, प्रतिनिधी
मुंबई - शारदीय नवरात्री आणि विजयादशमी झाल्यानंतर सर्वांच्या नजरा कोजागिरी पौर्णिमेकडे वळतात. कोजागिरी पौर्णिमा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण मानला जातो. प्रत्येक वर्षी आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला कोजागिरी साजरी केली जाते. त्यामुळे या कोजागिरी पौर्णिमेचा योग आणि त्याचे महत्त्व काय आहे, हे जाणून घेऊयात.
पौराणिक विद्या अभ्यासक सूरज सदानंद म्हशेळकर यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, शारदीय नवरात्री आणि विजयादशमी झाल्यानंतर कोजागिरी पौर्णिमेचे वेध लागतात. कोजागिरी पौर्णिमा वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेतील एक महत्त्वाची पौर्णिमा आहे. या पौर्णिमेला माणीकेथारी पौर्णिमा म्हणजेच मोती तयार करणारी अशी ही पौर्णिमा आहे.
advertisement
हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अर्थात, कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा असते. कोजागिरी म्हणजे कोण जागे आहे, असे म्हणत लक्ष्मी पृथ्वीवर येत असते आणि त्यामुळे या दिवशी जागृत राहणे गरजेचे असते. शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या खूप जवळ असतो. त्यामुळे आपल्याला चंद्राकरने मोठा दिसतो. चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखविला जातो आणि लक्ष्मीची पूजा केली जाते.
advertisement
या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा ही कोजागिरी पौर्णिमा 16 ऑक्टोबर 2024 रोजी साजरी केली जाणार असून पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्याची पूर्णिमा बुधवारी रात्री 8.40 वाजता सुरू होणार असून ही पौर्णिमा तिथी दुसऱ्या दिवशी 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4.56 मिनिटापर्यंत असणार आहे.
advertisement
त्याचप्रमाणे शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रातून निघणारी किरणे ही अमृतसारखी असतात. म्हणून या दिवशी लोक खीर किंवा दूध तयार करतात आणि रात्री ते चंद्रप्रकाशात ठेवतात. असे केल्याने चंद्राची किरणे त्या दुधावर किंवा खिरीवर पडतात आणि त्यावर अमृताचा प्रभाव होतो, असे मानले जाते.
सूचना - वर दिलेली माहिती ही ज्योतिषांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 15, 2024 11:40 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
विशेष आहे कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व, अभ्यासकांनी सांगितली ही महत्त्वाची माहिती