लग्नाच्या सीझनमध्ये व्हा मालामाल, 15 रूपयांपासून मिळतायत बांगड्या; कमी खर्चात बिझनेस
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
मुंबईतील क्रिसल प्लाझा हे इमिटेशन ज्वेलरीसाठी सर्वात मोठं आणि प्रसिद्ध होलसेल मार्केट मानलं जातं. येथे कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी विविध प्रकारच्या बांगड्या अगदी 15 रूपयांपासून मिळतात.
मुंबईतील मालाड पूर्व येथील क्रिसल प्लाझा हे इमिटेशन ज्वेलरीसाठी सर्वात मोठं आणि प्रसिद्ध होलसेल मार्केट मानलं जातं. येथे कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी विविध प्रकारच्या बांगड्या अगदी 15 रूपयांपासून मिळतात. काचेच्या, मेटल, प्लास्टिक, ऑक्साईड आणि युनिक डिझाईनच्या बांगड्यांची येथे मोठ्या प्रमाणात खरेदी- विक्री होते. व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान ₹4,000 ते ₹5,000 मध्ये चांगला स्टॉक तयार करता येतो.
बांगड्यांचे प्रकार आणि अंदाजे किंमती (होलसेल)
1) काचेच्या बांगड्या (Glass Bangles)
साध्या काचेच्या बांगड्या – 15 रूपयांपासून सुरू
60 रुपये बॉक्स (मिक्स डिझाईन)
हिरव्या मोठ्या काचेच्या बांगड्या – 140 रूपये (12 बांगड्यांचे बंडल)
22 काचेच्या बांगड्यांचे मोठे बंडल – 120 रूपये
मल्टी कलर काचेच्या बांगड्या – 300 रूपये बॉक्स
2) प्लास्टिक बांगड्या
advertisement
साध्या प्लास्टिक बांगड्या – 20 ते 40 रूपये
डिझाईनर प्लास्टिक सेट – 60 रूपये
3) मेटल बांगड्या
साधे मेटल पातळ सेट – 30 – 50 रूपये
गोल्डन/ सिल्व्हर मेटल डिझाईन – 60 ते 100 रूपये
4) ऑक्सिडाइज्ड (Oxidised) बांगड्या
साधे डिझाईन – 50 – 70 रूपये
जाड ऑक्साईड डिझाईन – 80 – 120 रूपये
advertisement
5) युनिक / ट्रेंडी बांगड्या
पार्टीवेअर सेट – 80 – 150 रूपये
मिक्स बॉक्स (10 –12 जोड्या) – 200 – 300 रूपये
मालाड पश्चिम रेल्वे स्टेशनपासून अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या क्रिस्टल प्लाझा या बिल्डिंगमध्ये हे संपूर्ण इमिटेशन ज्वेलरीचे मार्केट आहे. याच बिल्डिंगच्या तळमजल्यावर सुप्रिया बँगल्स हे बांगड्यांसाठी प्रसिद्ध असलेले होलसेल दुकान आहे. येथे होलसेल खरेदीसाठी आवश्यक तेवढा विविध स्टॉक सहज मिळू शकतो, तसेच या संपूर्ण मार्केटमध्ये इमिटेशन ज्वेलरीचे शेकडो पर्याय एक्सप्लोर करता येतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 24, 2025 4:13 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
लग्नाच्या सीझनमध्ये व्हा मालामाल, 15 रूपयांपासून मिळतायत बांगड्या; कमी खर्चात बिझनेस

