न्यूयॉर्कच्या तोडीस तोड! नवी मुंबईत उभारणार 45,000 क्षमतेचे जागतिक दर्जाचे करमणूक केंद्र; सिडकोकडून तयारी सुरू
Last Updated:
Navi Mumbai News : नवी मुंबईत देशातील पहिला बहुउद्देशीय इनडोअर अरेना उभारला जाणार आहे. २० हजार आसन क्षमता असलेले हे जागतिक दर्जाचे करमणूक केंद्र संगीत, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आभासी अनुभवांसाठी सक्षम होईल, रोजगार व पर्यटनाला चालना देईल.
नवी मुंबई : मुंबईसह नवी मुंबईत अनेक महत्त्वाचे प्रकल्प तयार होत आहेत. ज्यात सध्या नवी मुंबई उभारणाऱ्या एका प्रकल्पाची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. ज्यात नवी मुंबईत सिडको देशातील पहिला आयकॉनिक मल्टिपर्पज इनडोअर लाईव्ह एन्टरटेन्मेंट अरेना उभारणार आहे. ज्याच्या उभारणीची सुरुवात लवकर होणार आहे.
नवी मुंबईत उभारणार 45,000 क्षमतेचे जागतिक दर्जाचे करमणूक केंद्र
न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन आणि लंडनमधील ओटू अरेनाच्या प्रेरणेवर हा प्रकल्प आधारित आहे. यामुळे नवी मुंबईत जागतिक दर्जाची करमणूक खुली होईल आणि कलाकार, उद्योजक तसेच स्थानिकांसाठी अनेक संधी उपलब्ध होतील. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले की, यामुळे नवी मुंबईचे जागतिक स्तरावर स्थान अधिक बळकट होईल.
advertisement
महत्त्वाचे म्हणजे हा प्रकल्प रोजगारनिर्मितीला चालना देईल तसेच पर्यटन वाढवेल आणि नवीन उद्योगांच्या संधी निर्माण करेल. अरेनामध्ये 20 हजार बसून पाहणारे आणि 25 हजार उभे प्रेक्षक यांची क्षमता असेल. यामुळे देशातील हा पहिला जागतिक दर्जाचा आणि मोठ्या क्षमता असलेला इनडोअर अरेना बनेल.
अटल सेतू ट्रान्स-हार्बर लिंक, हाय-स्पीड रेल्वे मार्ग आणि नवी मुंबई मेट्रोमुळे शहराची कनेक्टिव्हिटी सुधारली आहे. नेरूळ जेट्टीमुळे पर्यटन, जलवाहतूक आणि चित्रपटनिर्मितीच्या संधीही वाढणार आहेत. खारघरमधील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये फिफा मानकांची चार खेळपट्ट्या आणि 4 हजार आसनांची स्टेडियम सुविधा आहे. तसेच खारघर व्हॅली गोल्फ कोर्समुळे नवी मुंबईचे क्रीडा आणि करमणूक क्षेत्र अधिक बळकट झाले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 08, 2025 1:17 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
न्यूयॉर्कच्या तोडीस तोड! नवी मुंबईत उभारणार 45,000 क्षमतेचे जागतिक दर्जाचे करमणूक केंद्र; सिडकोकडून तयारी सुरू


