मोठी बातमी, सुरक्षा दलाच्या चकमकीत 5 माओवाद्यांचा खात्मा, 2 जवान शहीद
- Published by:Sachin S
- Reported by:महेश तिवारी
Last Updated:
बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गंगलूरच्या जंगलात आज सकाळपासून सुरक्षा दलाने अभियान राबवलं आहे
छत्तीसगड : देशभरात एकीकडे माओवाद्यांचं आत्मसमर्पण अभियान सुरू असताना छत्तीसगडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत 5 माओवादी ठार झाले आहेत. तर माओवाद्यांच्या हल्ल्यात 2 जवान शहीद झाले आहेत. अजूनही चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गंगलूरच्या जंगलात आज सकाळपासून सुरक्षा दलाने अभियान राबवलं आहे. जवानांनी माओवाद्यांना घेरल्यानंतर चकमक सुरू झाली. दुपारी या चकमकीमध्ये पाच माओवादी ठार झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर दुसरीकडे माओवाद्यांच्या प्रती हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत, अजूनही चकमक सुरूच आहे. घटनास्थळी सुरक्षा दलाची अतिरिक्त जवान दाखल झाले आहे.
advertisement
(सविस्तर बातमी लवकरच)
Location :
Chhattisgarh
First Published :
December 03, 2025 4:38 PM IST


