EDच्या अधिकाऱ्याला ACBने ठोकल्या बेड्या, एका केसमध्ये सेटलमेंटसाठी मागितली लाच
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
एका चिट फंड कंपनीच्या प्रकरणी सेटलमेंट करण्यासह इतर सुविधा पुरवण्याच्या नावावर ईडी अधिकाऱ्याने 17 लाखांची मागणी केली होती.
जयपूर, 02 नोव्हेंबर : सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडलं आहे. ईडीचा अधिकारी एका प्रकरणात सेटलमेंट करण्यासाठी आणि इतर सुविधा देण्यासाठी पीडीत व्यक्तीकडून 17 लाख रुपयांची मागणी करत होता. त्यातले 15 लाख रुपये देत असताना ईडी अधिकाऱ्यासह दोघांना एसीबीने अटक केली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, राजस्थानच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ईडीमध्ये कार्यरत असलेला अधिकारी नवलकिशोर मीना आणि सहकारी बाबूलाल मीना यांना अटक केलीय. दोघेही 15 लाख रुपयांची लाच स्वीकारत होते. यानंतर अधिकाऱ्याच्या अनेक ठिकाणांवर एसीबीने छापे टाकले आहेत. एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिलीय.
advertisement
मणिपूरमध्ये एका चिट फंड कंपनीच्या प्रकरणी सेटलमेंट करण्यासह इतर सुविधा पुरवण्याच्या नावावर ईडी अधिकाऱ्याने 17 लाखांची मागणी केली होती. शेवटी तडजोड करत 15 लाख रुपये देण्याची तयारी पीडित व्यक्तीने केली होती. ईडी अधिकाऱ्यासाठी काम करणाऱ्या सहकाऱ्यालाही एसीबीने अटक केली. अलवरमध्ये यासाठी सापळा रचण्यात आला होता. हे प्रकरण मोठं असल्याने एसीबीचे अधिकारी अलवरला पोहोचले आहेत.
advertisement
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मणिपूरमध्ये काही दिवसांपूर्वी चिट फंड कंपनी चालवल्याबद्दल आणि फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी पीडित व्यक्तीकडे ईडीच्या अधिकाऱ्याने पैसे मागितले. पीडित व्यक्तीने याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. यानंतर एसीबीने सापळा रचून नवलकिशोर मीनाला रंगेहाथ पकडलं. दोघांचीही एसीबी कार्यालयात चौकशी सुरू आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 02, 2023 2:34 PM IST


