300 मिटरपर्यंत उडाले मानवी तुकडे, रात्री 11.30 वाजता काय घडलं? 9 फॉरेन्सिक अधिकाऱ्यांचा जीव कसा गेला?

Last Updated:

श्रीनगरच्या नौगाम पोलीस स्टेशनमध्ये अमोनियम नायट्रेटच्या स्फोटात ९ मृत, २७ जखमी. FSL, पोलीस अधिकारी मृत्युमुखी. SKIMS हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार.

News18
News18
जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमधील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी रात्री मोठा स्फोट घडला आहे. या स्फोटात एकूण ९ जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. तर २७ लोक गंभीर जखमी झाले आहेत. मयतांमध्ये बहुतांशी लोक हे फॉरेन्सिक टीम, पोलीस आणि सरकारी अधिकारी होते. दिल्लीत स्फोटाची घटना ताजी असताना आता जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या भयंकर स्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. रात्री साडेअकराच्या सुमारास हा स्फोट घडलं?

रात्री साडे अकरा वाजता नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट जप्त केलेल्या स्फोटकांमध्ये (अमोनियम नायट्रेट) घडला आहे. जखमींपैकी किमान पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे, त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. नौगाम पोलीस स्टेशनमध्ये झालेला स्फोट इतका भीषण होता की त्यामुळे स्टेशन परिसरात मानवी अंगाच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या. मृतांमध्ये बहुतेक लोक पोलीस आणि फॉरेन्सिक सायन्स टीमचे (FSL) अधिकारी होते. हे सर्वजण जप्त केलेल्या स्फोटकांची तपासणी करत होते, याचवेळी हा स्फोट घडला आहे. श्रीनगर प्रशासनाच्या एका नायब तहसीलदारासह दोन अधिकारीही या स्फोटात मृत्युमुखी पडले.
advertisement
फॉरेन्सिक टीम आणि पोलीस फरीदाबादहून आणलेल्या स्फोटक पदार्थांची तपासणी करत असताना हा स्फोट झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की स्फोटामुळे जवळपासच्या इमारतींनाही नुकसान झाले, स्फोटाच्या तीव्रतेने इमारती हादरल्या. जखमींना भारतीय लष्कराच्या हॉस्पिटल आणि शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SKIMS) येथे नेण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकारी नौगाममध्ये पोहोचले आहेत आणि परिसराला वेढा घालण्यात आला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील नौगाम पोलीस स्टेशन परिसरात झालेल्या स्फोटाच्या ठिकाणी तपास करण्यासाठी सुरक्षा दल, डॉग स्कॉड दाखल झाले आहेत.
advertisement
विशेष म्हणजे, नौगाम पोलीस स्टेशननेच परिसरातील विविध ठिकाणी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे पोस्टर्स चिकटवल्याचे प्रकरण उघडकीस आणलं होतं. नौगाम पोलिसांमुळेच दिल्ली स्फोटाशी संबंधित असलेल्या व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश झाला होता. या शोधानंतर, तपास यंत्रणांनी हरियाणातील फरिदाबादमधून अंदाजे २,९०० किलो स्फोटके जप्त केली होती. तसेच अनेक दहशतवादी डॉक्टरांनाही अटक केली.
advertisement
ऑक्टोबरमध्ये, अटक केलेल्या डॉक्टरांमध्ये आदिल अहमद राथेर नावाचा डॉक्टरही होता. त्याने काश्मीरमध्ये सुरक्षा दलांवर आणि बाहेरील लोकांवर मोठ्या हल्ल्यांचा इशारा देणारे पोस्टर्स लावले होते. त्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी त्याला सर्वप्रथम अटक झाली होती. त्याच्या अटकेमुळे १० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात सहभागी असलेल्या व्हाईट कॉलर दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश झाला. त्यात १३ लोकांचा मृत्यू झाला.
view comments
मराठी बातम्या/देश/
300 मिटरपर्यंत उडाले मानवी तुकडे, रात्री 11.30 वाजता काय घडलं? 9 फॉरेन्सिक अधिकाऱ्यांचा जीव कसा गेला?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement