Shrinagar Blast: श्रीनगर हादरलं! पोलीस स्टेशनमध्ये भीषण स्फोट, फॉरेन्सिक अधिकाऱ्यांसह 9 जणांचा मृत्यू, 27 जखमी, दिल्ली स्फोटाशी थेट कनेक्शन
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Shrinagar Blast: दिल्लीतील कार स्फोट, श्रीनगर पोलीस स्टेशन स्फोट, जैश-ए-मोहम्मद, डॉ. आदिल अहमद राथर, डॉ. मुजम्मिल शकिल, डॉ. उमर नबी यांचा सहभाग उजागर.
कार स्फोटाच्या घटनेनं दिल्ली हादरली, त्याचे दहशतवादाशी असलेले कनेक्शन आणि व्हाइट कॉलर दहशतवादामागे लपलेला काळा चेहरा आणि त्याची पाळंमुळं शोधत असतानाच सुरक्षा यंत्रणेसोबतच धक्कादायक घटना घडली. कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतलं. पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात जप्त करून ठेवलेल्या स्फोटक पदार्थांचा साठा अचानक फुटला आणि परिसरात मोठा स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर २७ हून अधिक जण जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
श्रीगनरमधील पोलीस स्टेशन स्फोटानं हादरलं
जम्मू कश्मीरमधील श्रीगनर भागात शुक्रवारी रात्री उशिरा धक्कादायक घटना घडली. दुर्दैवाची बाब म्हणजे या स्फोटाची तपासणी करणारे फॉरेन्सिक टीमच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. या स्फोटात नायब तहसीलदारासह श्रीनगर प्रशासनातील दोन अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. जखमींना भारतीय लष्कराच्या '९२ बेस हॉस्पिटल' आणि 'शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस' (SKIMS) येथे तातडीने उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी नौगाम येथे पोहोचले असून, परिसर सील करण्यात आला आहे.
advertisement
#BREAKING: Jammu & Kashmir 📍
🚨⚠️⚠️
Explosion at the Nowgam Police Station of Srinagar, J&K. The police station was key to the recent anti-terror investigation.#jammukashmir #shrinagar #delhi #Terrorism #TerroristAttack#carbombblast pic.twitter.com/M8ObNO9bw0
— U R B A N S E C R E T S 🤫 (@stiwari1510) November 14, 2025
advertisement
स्फोटात मृत्युमुखी झालेले अधिकारी याच कटाचा तपास करत होते
विशेष म्हणजे, ज्या नौगाम पोलीस स्टेशनमध्ये हा स्फोट झाला, याच स्टेशनच्या पथकाने 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेने लावलेल्या पोस्टर्सच्या प्रकरणाचा उलगडा केला होता. या पोस्टर्समुळेच एका 'व्हाईट-कॉलर' दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश झाला, ज्यात उच्चशिक्षित व्यावसायिक सहभागी होते. या तपासामुळे मोठ्या प्रमाणात स्फोटक सामग्री जप्त करण्यात आली आणि अनेक दहशतवादी डॉक्टर्सना अटक करण्यात आली. या मॉड्यूलमध्ये पाकिस्तान आणि इतर परदेशातील हँडलर्सच्या संपर्कात असलेले 'रेडिकलाईज्ड' व्यावसायिक आणि विद्यार्थी सामील असल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितलं होतं.
advertisement
दिल्ली स्फोटाशी जोडलेले सूत्रधार
या मॉड्यूलमध्ये ऑक्टोबरमध्ये अटक झालेला डॉ. आदिल अहमद राथरचा समावेश होता, ज्याने सुरक्षा दलांवर आणि 'बाहेरच्या' लोकांवर मोठ्या हल्ल्यांची धमकी देणारी पोस्टर्स लावली होती. राथरच्या अटकेमुळे एक मोठे जाळे उघडकीस आले, जे अलीकडेच १३ लोकांचा बळी घेणाऱ्या दिल्लीतील स्फोटामागे असल्याचेही नंतर सिद्ध झाले. पोलीस जेव्हा राथरची चौकशी करत होते, तेव्हा हरियाणातील फरिदाबाद येथील 'अल-फलाह मेडिकल कॉलेज'मध्ये काम करणाऱ्या डॉ. मुजम्मिल शकिलचे नाव पुढे आले. शकिलच्या घरावर टाकलेल्या छाप्यात ३,००० किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले. शकिलच्या अटकेनंतर याच विद्यापीठात काम करणाऱ्या डॉ. शाहीन सईदलाही अटक करण्यात आली.
advertisement
कार स्फोटात डॉ. उमर नबीचा सहभाग?
view commentsया घडामोडींच्या काही तासांनंतरच, प्रसिद्ध लाल किल्ल्याजवळ गर्दीच्या रस्त्यावर सिग्नलवर थांबलेल्या एका कारमध्ये स्फोट झाला, ज्यात १३ लोक ठार झाले. यानंतर डॉ. उमर नबी नावाच्या आणखी एका डॉक्टरांचे नाव समोर आले. सूत्रांनुसार, स्फोट झालेली ह्युंदाई आय-२० कार तोच चालवत होता. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या सूत्रांनी सांगितले की, बॉम्ब बनवण्यासाठी वापरले जाणारे रासायनिक पदार्थ जप्त झाल्यामुळे या संशयितांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असावे आणि त्यामुळेच त्यांनी बॉम्ब हलवण्याचा प्रयत्न केला. तपासकर्त्यांना शंका आहे की घाईघाईत बॉम्बची जुळवाजुळव योग्यरित्या न झाल्यामुळेच IED चे पूर्ण नुकसान झाले नाही, अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती.
Location :
Jammu,Jammu,Jammu and Kashmir
First Published :
November 15, 2025 6:38 AM IST
मराठी बातम्या/देश/
Shrinagar Blast: श्रीनगर हादरलं! पोलीस स्टेशनमध्ये भीषण स्फोट, फॉरेन्सिक अधिकाऱ्यांसह 9 जणांचा मृत्यू, 27 जखमी, दिल्ली स्फोटाशी थेट कनेक्शन


