Ekadashi 2025: आजची उत्पत्ती एकादशीची पूजा या कार्यांशिवाय निष्फळ, बिकट संकटातूनही मार्ग मिळतो

Last Updated:

Ekadashi 2025: एकादशी तिथीला श्री हरी विष्णूची, पंढरीच्या पांडुरंगाची पूजा करण्याची परंपरा आहे. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला उत्त्पत्ती एकादशी साजरी केली जाते. प्रत्येक एकादशीचं वेगळं धार्मिक महत्त्व सांगितलं जातं, त्यानुसार ही एकादशी व्रत सुरू करण्यासाठी शुभफळदायी मानली जाते.

News18
News18
मुंबई : पंचांगानुसार आज उत्त्पत्ती एकादशी आहे. एकादशी तिथीला श्री हरी विष्णूची, पंढरीच्या पांडुरंगाची पूजा करण्याची परंपरा आहे. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला उत्त्पत्ती एकादशी साजरी केली जाते. प्रत्येक एकादशीचं वेगळं धार्मिक महत्त्व सांगितलं जातं, त्यानुसार ही एकादशी व्रत सुरू करण्यासाठी शुभफळदायी मानली जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, या दिवशी भगवान विष्णू एकादशी देवीच्या रूपात प्रकट झाले आणि त्यांनी मूर राक्षसाचा वध केला. म्हणूनच, या एकादशीला एकादशीची जननी मानलं जाते. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी भगवान विष्णूसाठी उपवास आणि पूजा केल्यानं सर्व पापांपासून मुक्ती मिळते, सुख, समृद्धी आणि संपत्तीचा आशीर्वाद राहतो. उत्पत्ती एकादशीला काही मंत्रांचा जप केल्यानं व्यक्तीचे भाग्य चमकते आणि हातून निसटलेले धनही परत मिळते. अशा मंत्रांविषयी जाणून घेऊ.
उत्पत्ती एकादशीला या मंत्रांचा करावा जप -
ओम नमो भगवते वासुदेवाय नम:।
ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्।
ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीवासुदेवाय नमः।
शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभाङ्गम्। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्॥.
श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेवाय।।
ॐ विष्णवे नम:
advertisement
ॐ हूं विष्णवे नम:
ॐ नमो नारायण। श्री मन नारायण नारायण हरि हरि।
लक्ष्मी विनायक मंत्र -
दन्ताभये चक्र दरो दधानं, कराग्रगस्वर्णघटं त्रिनेत्रम्। धृताब्जया लिंगितमब्धिपुत्रया लक्ष्मी गणेशं कनकाभमीडे।।
विष्णू देवाचे मंत्र -
ॐ अं वासुदेवाय नम:
ॐ आं संकर्षणाय नम:
ॐ अं प्रद्युम्नाय नम:
ॐ अ: अनिरुद्धाय नम:
ॐ नारायणाय नम:
advertisement
विष्णू पंचरूप मंत्र -
ॐ ह्रीं कार्तविर्यार्जुनो नाम राजा बाहु सहस्त्रवान। यस्य स्मरेण मात्रेण ह्रतं नष्टं च लभ्य
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Ekadashi 2025: आजची उत्पत्ती एकादशीची पूजा या कार्यांशिवाय निष्फळ, बिकट संकटातूनही मार्ग मिळतो
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement