Latur Crime : 'अनुष्काने स्वत:ला संपवलं नाही, तर तिच्यावर....', नवोदय हॉस्टेल विद्यार्थी मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Latur Navodaya Vidyalaya student death case : नवोदय विद्यालयातील सहावीच्या अनुष्का पाटोळे या विद्यार्थीने आत्महत्या केली होती. या प्रकरणात लातूर पोलिसांकडून ‘झिरो टॉलरन्स’ धोरणानुसार तपास सुरू आहे.
Latur Navoday Student Death in Hostel : लातूर इथल्या जवाहर नवोदय विद्यालयात सहावीत शिकणारी अनुष्का पाटोळे विद्यार्थिनी मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली होती. हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनीने दुर्दैवाने, रविवारी तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत सापडल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता या प्रकरणात राजकीय भूमिका समोर येऊ लागल्या आहेत. एनएसयुआयने या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत.
निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी
लातूरच्या चिंचोलीराव वाडी येथील जवाहरलाल नवोदय विद्यालयातील सातवीची विद्यार्थिनी अनुष्का पाटोळे हिचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. विद्यार्थी काँग्रेसने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. केवळ आत्महत्येचा ठपका ठेवून हे प्रकरण बंद करणे अन्यायकारक असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. शाळेतील मानसिक ताण, शैक्षणिक दबाव आणि समुपदेशनाचा अभाव यामुळेच ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप विद्यार्थी काँग्रेसने केलाय.
advertisement
मुलीचा मृत्यु आत्महत्येने नाही तर...
नवोदय विद्यालयात अनुष्का पाटोळे या मुलीचा मृत्यु आत्महलोने झालेला नाही, तर शाळेतील मानसिक ताण, शैक्षणिक दबाव, समुपदेशनाचा अभाव तसेच प्रशासनाची दुर्लक्षाची भूमिका कारणीभूत असण्याची शक्यता आहे, असं विद्यार्थी काँग्रेसने म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक
advertisement
या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून शाळा प्रशासन आणि शिक्षकांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दोषींवर कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय व मदत मिळावी, यासाठी रोहित बिराजदार, महेश सोळंके आणि इतर पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे.
view commentsLocation :
Latur,Maharashtra
First Published :
Jan 10, 2026 11:46 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
Latur Crime : 'अनुष्काने स्वत:ला संपवलं नाही, तर तिच्यावर....', नवोदय हॉस्टेल विद्यार्थी मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप!









