IPL 2026 Retentions : काव्या मारनला भारी पडणार 23 कोटींची स्ट्रॅटर्जी! पॅट कमिन्सच्या नादात मॅचविनर खेळाडूला डच्चू

Last Updated:

IPL Retained Players 2026 : सनरायझर्स हैदराबाद क्लासेनसारख्या महागड्या परदेशी बॅटरवर पूर्णपणे खर्च करण्याऐवजी हैदराबाद त्याला रिलीज करण्याची शक्यता आहे.

IPL 2026 SRH Retentions
IPL 2026 SRH Retentions
IPL 2026 SRH Retentions : आगामी आयपीएलसाठी सनरायझर्स हैदराबाद टीमच्या रणनितीबद्दल मोठी चर्चा सुरू झाली आहे. आज सर्व संघाचे रिटेन्शन जाहीर होतील. अशातच आता सनरायझर्स हैदराबाद पॅट कमिन्सला कायम ठेवण्याची शक्यता अधिक आहे. पॅट कमिन्सच्या रुपात हैदराबादला कॅप्टन मिळाला आहे. पॅट कमिन्सची प्राईज मनी जास्त असल्याने हैदराबाद बाकी मोठ्या खेळाडूंना रिलीज करेल, अशी शक्यता आहे.

ट्रॅव्हिस हेड अन् अभिषेक शर्माचं काय होणार?

पॅट कमिन्ससोबतच, सलामीवीर ट्रॅव्हिस हेड (13 मॅचमध्ये 162.61 च्या उत्कृष्ट स्ट्राइक रेटने 374 रन्स) आणि युवा बॅटर अभिषेक शर्मा (14 मॅचमध्ये 193.39 च्या दमदार स्ट्राइक रेटने 439 रन्स) या कोर ग्रुपमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक विकेटकीपर-बॅटर हेनरिक क्लासेन याच्या भवितव्याबद्दल मात्र अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
advertisement

हेनरिक क्लासेनला रिलीज करणार? 

SRH फ्रेंचायझी मिनी-ऑक्शनपूर्वी हेनरिक क्लासेनला रिलीज करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली होती. गेल्या दोन सिझनमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली असली तरी, टीम आपल्या पर्समध्ये (लिलावासाठीची रक्कम) अधिक पैसे वाढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे क्लासेनसारख्या महागड्या परदेशी बॅटरवर पूर्णपणे खर्च करण्याऐवजी हैदराबाद त्याला रिलीज करण्याची शक्यता आहे.
advertisement

SRH कोणाला देणार नारळ? 

दरम्यान, क्लासेनला रिलीज करून लिलावातून कमी किमतीत पुन्हा टीममध्ये घेण्याचा SRH चा प्रयत्न असू शकतो. तसेच सचिन बेबी, जयदेव उनाडकट, ब्रायडन कार्स, मोहम्मद शमी या खेळाडूंना देखील डच्चू दिला जाणार आहे. हर्षल पटेल, सिमरजीत सिंग, राहुल चहर यांना देखील बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
advertisement
SRH चे संभाव्य कायम ठेवलेले खेळाडू : ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, स्मरण रविचंद्रन, नितीश कुमार रेड्डी, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स, अभिषेक शर्मा, एशान मलिंगा, ॲडम झाम्पा, कमिंदू मेंडिस, अथर्व तायडे, अनिकेत वर्मा, जीशान अन्सारी.
SRH चे संभाव्य सोडलेले खेळाडू : हेन्रिक क्लासेन, सचिन बेबी, जयदेव उनाडकट, ब्रायडन कार्स, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, सिमरजीत सिंग, राहुल चहर.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 Retentions : काव्या मारनला भारी पडणार 23 कोटींची स्ट्रॅटर्जी! पॅट कमिन्सच्या नादात मॅचविनर खेळाडूला डच्चू
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement