Clothes Odor : हिवाळ्यात कपड्यांमधून वास येतोय? हे घरगुती उपाय करा, कपडे राहतील फ्रेश-सुगंधी
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How to remove odor from clothes : हिवाळा सुरू होताच, लोक त्यांच्या कपाटातून त्यांचे उबदार कपडे, चादर आणि ब्लँकेट बाहेर काढतात. मात्र ते वर्षभर साठवले जात असल्याने, त्यांना अनेकदा एक विचित्र वास येतो. लोक हा वास दूर करण्यासाठी परफ्यूम वापरतात. मात्र काही सोप्या घरगुती उपायांनी हा वास लवकर दूर करता येतो.
तुम्हाला हा वास सहजपणे दूर करायचा असेल, तर हे कपडे सूर्यप्रकाशात ठेऊ शकता. सूर्यप्रकाश कपड्यांमधून ओलावा आणि बॅक्टेरिया काढून टाकतो. सकाळी सूर्यप्रकाशात ब्लँकेट किंवा चादर कमीत कमी 3-4 तास बाहेर ठेवल्याने ते फ्रेश होतील आणि घाणेरडा वास नाहीसा होईल. तुम्ही तुमचे कपडे सूर्यप्रकाशात ठेऊ शकत नसाल, तर खोलीतील खिडक्या उघडा जेणेकरून नैसर्गिक वायुवीजन होईल.
advertisement
कपड्यांचा वास दूर करण्यासाठी बेकिंग सोडादेखील वापरू शकता. बेकिंग सोडा वास शोषण्यासाठी खूप प्रभावी आहे. तुमच्या चादर किंवा जॅकेटवर थोडासा बेकिंग सोडा शिंपडा आणि एक तासासाठी सोडा, नंतर झटकून स्वच्छ करून घ्या किंवा ब्रशने स्वच्छ करा. तुम्ही लाँड्री डिटर्जंटमध्ये मिसळलेले बेकिंग सोडा देखील वापरू शकता. हे केवळ वास काढून टाकत नाही तर कपडे मऊ देखील करते.
advertisement
तुम्ही हा वास दूर करण्यासाठी पांढरा व्हिनेगर देखील वापरू शकता. अर्धा कप व्हिनेगर एक बादली पाण्यात मिसळा आणि त्यात चादर किंवा उबदार कपडे 15-20 मिनिटे भिजवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. व्हिनेगर नैसर्गिक दुर्गंधीनाशक म्हणून काम करते आणि बुरशीचा वास पूर्णपणे काढून टाकते. तुम्हाला कपडे धुवायचे नसतील, तर तुम्ही स्प्रे बाटलीत व्हिनेगर आणि पाणी मिसळून हलकेच स्प्रे करू शकता.
advertisement
advertisement


