सगळं काही सुरळीत सुरू असताना अचानक बरोबर 6 दिवसांनंतर दिल्लीपेक्षा भयंकर स्फोट श्रीनगरमध्ये झाला. रात्री 11.30 वाजता हा स्फोट झाला. या स्फोटाची भीषणता इतकी भयंकर होती की दारं खिडक्या हादरुन गेले, इतकंच नाही तर काही किलोमीटरपर्यंत स्फोटाचा भयंकर आवाज आला. या घटनेमुळे श्रीनगर परिसर हादरुन गेला. या स्फोटाचं दिल्ली कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे. व्हाइट कॉलरमागे लपलेल्या दहशतवादाचे धागेदोरे शोधण्यासाठी श्रीनगरमध्ये पोलीस आणि फॉरेन्सिक टीम काम करत होते. त्यावेळी जप्त केलेल्या IED चा साठा हा श्रीनगरमध्ये ठेवण्यात आला होता. या IED चा भयंकर स्फोट झाला.
@श्रीनगर के नौगाम पुलिस स्टेशन से
बड़े धमाके की खबर आ रही है।
विस्फोटक इतना बड़ा था कि काफी दूर तक इसकी धमक सुनाई दी
दिल्लीपासून सुमारे ८०० किलोमीटर दूर असलेल्या जम्मू-काश्मीरमधील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा भीषण स्फोट झाला. या भीषण स्फोटात आतापर्यंत नऊ लोकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे मोठा कोलाहल माजला असून, पोलीस ठाण्याच्या आत हा स्फोट नेमका कसा झाला, हा प्रश्न उभा राहिला आहे. हा हल्ला दहशतवाद्यांनी केला की केवळ निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली, तसेच या नौगाम स्फोटाचा दिल्लीतील लाल किल्ला स्फोट आणि फरीदाबाद टेरर मॉड्यूलशी काय संबंध आहे, याची चौकशी सुरू आहे.
श्रीगनरच्या नौगाम पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. फरीदाबाद टेरर मॉड्यूलशी संबंधित जप्त केलेल्या स्फोटकांचे नमुने पोलीस घेत असतानाच अचानक हा मोठा स्फोट झाला. फरीदाबाद येथील डॉ. मुजम्मिल गनई यांच्या भाड्याच्या घरातून जम्मू-काश्मीर पोलिसांनी ३६० किलो स्फोटक सामग्री जप्त केली होती आणि याच स्फोटकांचे नमुने घेतले जात होते. नमुना घेताना झालेल्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचे मानले जात आहे.
नौगाममध्ये रात्री ११.३० वाजता झालेला हा स्फोट लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटासारखाच भयावह होता. हा स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज दूरवर ऐकू आला. नौगाम पोलीस स्टेशन परिसरात जणू भूकंप झाल्यासारखे वाटले. स्फोटानंतर मृतदेह विच्छिन्न झाले होते आणि मांसाचे तुकडे इकडे-तिकडे विखुरलेले दिसत होते. अनेक मीटर दूरपर्यंत मृतदेहांचे अवयव आढळून आले. दिल्लीतील स्फोटाच्या वेळीही असेच भयानक दृश्य पाहायला मिळाले होते.
नौगाम स्फोटाचा दिल्लीतील लाल किल्ला कार स्फोटाशी थेट संबंध आहे, कारण दिल्लीतील स्फोटात अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आला होता आणि नौगाममध्येही पोलीस त्याच अमोनियम नायट्रेटच्या स्फोटक सामग्रीचे नमुने घेत होते. मृतांमध्ये बहुतांश पोलीस आणि स्फोटकांची तपासणी करणारे फॉरेन्सिक टीमचे (FSL) अधिकारी होते. या स्फोटात श्रीनगर प्रशासनातील एका नायब तहसीलदारासह दोन अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे.
नौगाम पोलीस स्टेशननेच दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने लावलेल्या पोस्टर्सच्या प्रकरणाचा तपास सुरू करून फरीदाबाद मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यासाठी पहिले पाऊल उचलले होते. याच तपासामुळे उच्चशिक्षित व्यावसायिकांचा समावेश असलेल्या एका दहशतवादी मॉड्यूलचा खुलासा झाला. या खुलास्यानंतर तपास यंत्रणांनी सुमारे २९०० किलो स्फोटक सामग्री जप्त केली आणि अनेक दहशतवादी डॉक्टरांना अटक केली. ऑक्टोबरमध्ये अटक झालेला डॉ. आदिल अहमद राथर हा 'व्हाईट-कॉलर' दहशतवादातील प्रमुख चेहरा होता, जो नंतर दिल्लीतील स्फोटाच्या कटात सामील असल्याचे उघड झाले. नौगाम पोलीस स्टेशनमध्ये स्फोटकांचा साठा नेमका कशासाठी ठेवला होता आणि स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याची कसून चौकशी सुरू झाली आहे.