पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा! खरडलेल्या जमिनींसाठी मिळणार हे लाभ
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे.
तुषार रुपनवार (प्रतिनिधी) मुंबई : अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. शेतीची जमीन वाहून गेली, सुपीक थर खरडून निघून गेला किंवा माती वाहून गेल्यामुळे शेती पुन्हा सुरू करणे कठीण बनले आहे. अशा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
निर्णय काय?
पुरामुळे खरडलेल्या, वाहून गेलेल्या किंवा नुकसान झालेल्या शेतजमिनीला पूर्वस्थितीत आणण्यासाठी लागणारी माती, गाळ, मुरूम आणि कंकर मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना कोणतेही शुल्क, कर किंवा गौण खनिजांवरील रॉयल्टी देण्याची गरज राहणार नाही. महसूल विभागाने याबाबतचे परिपत्रक जाहीर केले असून हा निर्णय तात्काळ लागू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
advertisement
जमिनीची सुपीकता पुनर्स्थापित करण्यासाठी प्रयत्न
पूरामुळे ज्या शेतजमिनींचा पोत बिघडला आहे, भुयारी पाणी वाढल्याने गाळ वाहून गेला आहे किंवा जमिनीचा सुपीक थर नष्ट झाला आहे, अशा जमीनमालकांसाठी हा निर्णय मोठा आधार ठरणार आहे. शेतकऱ्यांना पुन्हा लागवडीयोग्य जमीन तयार करण्यासाठी लागणारी नैसर्गिक माती आणि खनिजे अत्यावश्यक असतात. मात्र या साहित्याची वाहतूक, खरेदी आणि रॉयल्टीचा आर्थिक बोजा शेतकऱ्यांवर मोठा होत होता.
advertisement
महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिलेल्या आदेशानुसार आता या साहित्यावरची गौण खनिज रॉयल्टी पूर्णपणे माफ केली जाईल. म्हणजेच माती किंवा गाळ काढण्यासाठी परवानगी घेतल्यावर शेतकऱ्यांना कोणताही सरकारी फी आकारली जाणार नाही.
जिल्हाधिकाऱ्यांना काटेकोर अंमलबजावणीचे आदेश
view commentsराज्यभरात या निर्णयाची तात्काळ आणि काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी महसूलमंत्री बावनकुळे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 15, 2025 9:50 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा! खरडलेल्या जमिनींसाठी मिळणार हे लाभ


