Wedding Tradition : लग्न झालेल्या महिलांना मंगळसूत्र, तसा पुरुषांसाठी कोणताच सौभाग्यलंकार का नसतो?

Last Updated:
Wedding Tradition Why Only Bride wear Mangalsutra Not Groom : सोन्या-चांदीचे दागिने फक्त महिलाच नाही तर पुरुषही घालतात. असं असलं तरी लग्नानंतर मंगळसूत्र, जोडवी घालण्याचं बंधन फक्त महिलांना का पुरुषांना का नाही?
1/7
गळ्यात मंगळसूत्र, पायांच्या बोटात जोडवी, हातात हिरवा चुडा हे महिलांचे सौभाग्यलंकार म्हणजे लग्नात महिलांना हे दागिने घातले जातात आणि त्यांना ते नंतर आयुष्यभर घालावे लागतात. हे दागिने म्हणजे महिला विवाहित असल्याचा पुरावा ज्याला बहुतेक जण मजेत लग्न झाल्याचं लायसन असंही म्हणतात.

advertisement
2/7
पण लग्न हे पुरुष आणि महिला असं दोघांचं असतं. पण मग फक्त महिलांनाच सौभाग्यलंकार का? विवाहित पुरुषांसाठी असा कोणता दागिना का नाही? असा प्रश्न प्रत्येकाला विशेषत: महिलांना कधी ना कधी पडला असेलच. तुम्हालाही पडला असेल. आता याचं उत्तर बहुतेक जण पुरुष दागिने घालत नाही असंही होऊ शकत नाही. कारण पुरुष गळ्यात, हातात सोन्या-चांदीचे दागिने घालतातच. मग त्यांच्यासाठी लग्न झाल्यानंतरचे दागिने का नाहीत?

3/7
सोशल मीडियावर उपलब्ध माहितीनुसार पूर्वीच्या काळापासून ते आतापर्यंत कष्टाची कामं पुरुष करत आले. शेती, लोहार, सुतार अशी विविध कामं पुरुष करत असत. कधी मातीत तर कधी ऊन वारा पावसात ही कामं असायची. अशावेळी किमती अलंकार शरीरावर घालणं म्हणजे मोठी जोखीम असायची किंवा त्यास इजा पोहण्याची शक्यता होती.

4/7
तसंच चोरी करणाऱ्या टोळीची देखील भिती असे. रानवाटांमधून जाताना दागिन्यांची चोरी होणं या शक्यता जास्त असायच्या. त्यामुळे पुरुषांना फारसे अलंकार घालण्याची मुभा नसायची. त्यामुळे स्त्रियांना जशी या दागिन्यांची बंधनं आहेत तशी पुरुषांना नसतात.

5/7
असं असलं तरी पुरुषांना जबाबदारीची बंधनं आहेत. आई, वडील, मुलं, भाऊ आणि पत्नी यांच्या पाठीशी उभं राहणं हे पुरुषांचं पहिलं कर्तव्य मानलं जातं. संकटात असताना त्यांना धीर देणं, त्यांची काळजी घेणं, संकटात लढण्याचं बळ देणं, कोणत्याही परिस्थिती कुटुंबाच्य़ा बरोबर ढालीसारखं उभं राहणं ही त्यांची जबाबदारी.

6/7
दागिन्यांच्या बाबतीत किंवा शारीरिक अशी अनेक बंधनं पुरुषांना नसली तरी मानसितक जबाबदाऱ्या पुरुषांना कायम असतात. फक्त याचं भान ठेऊन ही जाबाबदारी आणि बंधनं पुरुषांनी पाळायच्य़ा असतात.

7/7
आता काळ बदलला आहे, स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कामं करत आहेत. त्यामुळे पुर्वापार चालत आलेल्या या अलंकारांची बंधनं आता शिथिल झालेली आहेत. शिवाय काही लग्नात तुम्ही नवरी नवरदेवाला मंंगळसूत्र किंवा लग्न झाल्याचं प्रतीक म्हणून त्याच्या गळ्यात एखादी चैन किंवा दोरा बांधताना पाहिली असेल.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement