Navi Mumbai Airport : तारीख ठरली! नवी मुंबई विमनातळ प्रवासीसेवेसाठी सज्ज, 'या' शहरांत होणार थेट उड्डाणे

Last Updated:

Navi Mumbai Flight Services : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासीसेवा सुरू होण्याची तारीख जाहीर झाली आहे. चला तर याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

 navi mumbai airport
navi mumbai airport
नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाबाबत सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जी की येत्या महिन्यात या विमानतळावरुन प्रवासी उड्डाण सेवांना सुरुवात होत आहे. पण ही सेवा डिसेंबरच्या कोणत्या तारखेपासून आणि नेमकी कोणत्या शहरांसाठी सुरु होणार ते एकदा जाणून घ्या.
नवी मुंबईतून सुरू होणार थेट हवाई सेवा
अकासा एअरच्याच्या अधिकृतवेबसाईटनुसार, 25 डिसेंबर 2025 पासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्यांच्या प्रवासी उड्डाणांना सुरुवात होणार आहे. इतकंच नाही तर नवी मुंबई विमानतळावरून अकासा एअर दिल्ली तसेच गोवा, कोची आणि अहमदाबाद या चार शहरांसाठी थेट उड्डाणे देणार आहे. यामुळे मुंबई शहरातील प्रवाशांना मोठी सुविधा मिळणार आहे.
advertisement
कसे असेल वेळापत्रक?
फ्लाइट्सचे वेळापत्रकही प्रवाशांसाठी खूप सोयीस्कर असे ठेवण्यात आले आहे. काही विमानांची उड्डाणे दररोज असतील तर काही फ्लाइट्स विशिष्ट दिवशीच सुरु असतील. सकाळपासून ते रात्रीपर्यंत विविध वेळांवर दिल्ली, गोवा आणि कोचीसाठी फ्लाइट्स उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या सोयीप्रमाणे फ्लाइटची निवड करता येईल.
गोवा आणि कोचीसाठीच्या काही फ्लाइट्स ठराविक दिवशी चालतात तर दिल्ली आणि अहमदाबादसाठीची सेवा जास्त नियमित ठेवण्यात आली आहे. अहमदाबादसाठी विशेष सेवा 31 डिसेंबरपासून सुरू होत आहे.
advertisement
सुरु होणाऱ्या उड्डाणांबद्दल अधिक माहिती, तिकिटे आणि बुकिंगसाठी प्रवासी अकासा एअरच्या अधिकृत वेबसाइटला, मोबाइल अॅपला, किंवा त्यांच्या ट्रॅव्हल एजंटला संपर्क करू शकतात. तिकीट बुकिंग प्रक्रिया सोपी आणि जलद आहे. नवी मुंबई विमानतळावरून थेट उड्डाणांमुळे मुंबईतील वाहतूक आणि गर्दीची समस्या कमी होण्याची शक्यता असून प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai Airport : तारीख ठरली! नवी मुंबई विमनातळ प्रवासीसेवेसाठी सज्ज, 'या' शहरांत होणार थेट उड्डाणे
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement