'ते माझे वडील आहेत...' अंथरुणाला खिळलेल्या धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत सलमान खान भावुक
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Salman Khan on Dharmendra Health Update : सलमान खान आणि धर्मेंद्र यांचं बाप मुलासारखं नातं आहे. धर्मेंद्र यांच्या हेल्थबाबत बोलताना सलमान खान भावुक झाला.
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीसाठी सगळेच प्रार्थना करत आहेत. अनेक कलाकारांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. अनेक कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेता सलमान खान देखील धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत चिंतेत आहे. धर्मेंद्र यांच्या हेल्थवर बोलताना सलमान खान भावुक झाला.
सलमान खान आणि धर्मेंद्र यांचं बाप मुलासारखं नातं आहे. सलमान खान धर्मेंद्र यांचा मोठा चाहता आहे. त्यांचं एक गाणं पाहण्यासाठी तो 3-4 तास उभा राहायचा. धर्मेंद्र यांना तो आपले वडील मानतो. नुकत्याच एका कार्यक्रमात बोलताना सलमान खान धर्मेंद्र यांच्याबद्दल बोलताना भावुक झाला. "ते माझे वडील आहेत… ते लवकरच बरे होतील", असं सलमान खान म्हणाला.
advertisement
धर्मेंद्र यांची तब्येत काही दिवसांपासून बिघडलेली होती. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. साधारण 12 दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आलं. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखालीच त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत.
advertisement
तमन्ना भाटिया आणि जॅकलीन फर्नांडिससोबत द-बंग टूरसाठी सलमान खान कतारमध्ये पोहोचला होता. तिथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत धर्मेंद्रबद्दल विचारले असता सलमानने मन मोकळं केलं. तो म्हणाला,
"मी येण्यापूर्वी फक्त एकच व्यक्ती होती… धरमजी. ते माझे वडील आहेत, हे खरं आहे. मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो आणि आशा करतो की ते लवकरच बरे होतील." याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
advertisement
advertisement
धर्मेंद्रही सलमानला तिसरा मुलगा मानतात
फक्त सलमानच नाही, तर धर्मेंद्र देखील सलमानवर तितकंच प्रेम करतात. अनेक मुलाखतींमध्ये धर्मेंद्र यांनी सलमान खानला माझा तिसरा मुलगा असं म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं होतं, "सलमान माझ्यासारखाच आहे. त्याचं पर्सनॅलिटी कलरफुल आहे, अगदी माझ्यासारखी" सलमान आणि धर्मेंद्र यांनी अनेकदा कार्यक्रमांनिमित्त एकत्र स्टेज शेअर केला आहे. दोघांमधील हे नातं बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चेत असतं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 15, 2025 8:06 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'ते माझे वडील आहेत...' अंथरुणाला खिळलेल्या धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत सलमान खान भावुक


