IPL 2026 Retentions : मागल्या वर्षी ट्रॉफी थोडक्यात हुकली, श्रेयस आता चूक करणार नाही! पंजाब किंग्ज चार खेळाडूंना देणार डच्चू
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IPL 2026 Punjab Kings Retentions : मॅक्सवेलवर गेल्या सिझनमध्ये 4.2 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्याला रिलीज केल्यामुळे पंजाब किंग्जच्या पर्समध्ये मोठी रक्कम उपलब्ध होणार आहे.
Punjab Kings Retentions : आयपीएलसाठीच्या मिनी ऑक्शनपूर्वी (IPL 2026) पंजाब किंग्स (PBKS) टीमने मोठा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन ऑल-राउंडर ग्लेन मॅक्सवेल सह चार खेळाडूंना रिलीज करून टीमने आपल्या पुनर्रचनेची सुरुवात करण्याची तयारी आहे. मागील सिझनमध्ये उपविजेता राहिलेल्या पंजाब किंग्सने पुढील सिझनच्या तयारीसाठी हा महत्त्वपूर्ण बदल केला आहे. त्यामुळे पंजाब किंग्जमध्ये कोणते बदल होणार? असा सवाल अनेकांनी विचारला आहे.
मॅक्सवेलवर 4.2 कोटी रुपये खर्च
मॅक्सवेलला खराब फॉर्म आणि दुखापतीमुळे रिलीज करण्यात आले आहे. त्याने 7 मॅचमध्ये फक्त 48 रन्स केले आणि 4 विकेट्स घेतले. बोट्याच्या दुखापतीमुळे तो उर्वरित मॅचेस खेळू शकला नाही. मॅक्सवेलवर गेल्या सिझनमध्ये 4.2 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्याला रिलीज केल्यामुळे पंजाब किंग्जच्या पर्समध्ये मोठी रक्कम उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे लिलावात अधिक पर्याय निवडता येतील.
advertisement
कोणाला काय ठेवणार?
टीम आपल्या प्रमुख खेळाडूंना कायम ठेवणार आहे. कर्णधार श्रेयस अय्यर, अर्शदीप सिंह, शशांक सिंह, प्रभसिमरन सिंह, प्रियांश आर्या, जोश इंग्लिस आणि नेहल वढेरा यांसारखे खेळाडू टीमचा गाभा असतील. पंजाब किंग्जने IPL 2025 मध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली होती. अशातच आता आगामी आयपीएल हंगामात देखील अफलातून कामगिरी करत विजय रचण्याची तयारी श्रेयसने केली आहे.
advertisement
परदेशी खेळाडूंचा कोटा कसा राखणार?
एरोन हार्डी या ऑस्ट्रेलियन ऑल-राउंडरला गेल्या लिलावात 1.25 कोटी रुपयांना विकत घेतले होते, पण त्याला एकाही मॅचमध्ये संधी मिळाली नाही. परदेशी खेळाडूंचा कोटा संतुलित करण्यासाठी त्याला रिलीज केले आहे. कुलदीप सेन आणि विष्णू विनोद या दोन्ही भारतीय खेळाडूंनी IPL 2025 मध्ये एकही मॅच खेळली नाही. कुलदीप सेन (80 लाख रुपये) आणि विष्णू विनोद (95 लाख रुपये) यांना रिलीज करून टीम आता युवा आणि अधिक उपयुक्त देशांतर्गत बॉलर्स आणि बॅटर्सचा शोध घेईल.
advertisement
IPL 2025 साठी पंजाब किंग्जची टीम
श्रेयस अय्यर, प्रियांश आर्य, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, नेहल वढेरा, ग्लेन मैक्सवेल, विशाक विजयकुमार, हरप्रीत बराड़, विष्णु विनोद, मार्को जानसन, लॉकी फर्ग्यूसन, जोश इंगलिस, जेवियर बार्टलेट, मुशीर खान, हरनूर पन्नू, कुलदीप सेन, पायला अविनाश, सूर्यांश शेडगे, आरोन हार्डी, अजमतुल्लाह उमरजई, काइल जेमीसन, यश ठाकुर आणि मार्कस स्टोइनिस.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 15, 2025 9:12 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 Retentions : मागल्या वर्षी ट्रॉफी थोडक्यात हुकली, श्रेयस आता चूक करणार नाही! पंजाब किंग्ज चार खेळाडूंना देणार डच्चू


