Dharmendra Family : 2 पत्नी, 6 मुलं, 3 सूना अन् 13 नातवंड! धर्मेंद्र यांचं भलमोठं कुटुंब, कोण काय करतं?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Dharmendra Family:अभिनेते धर्मेंद्र गेली 65 वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. 300 हून अधिक सिनेमात काम करणाऱ्या धर्मेंद्र यांचा इक्कीस हा सिनेमा येत्या डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. धर्मेंद्र यांनी अनेक सिनेमात काम करत बॉलिवूडमध्ये त्यांचा मोठा मित्र परिवार जमवला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का धर्मेंद्र यांची खरी फॅमिली खूप मोठी आहे. त्यांच्या घरात त्यांची 13 नातवंड आहेत, अनेक सूना आहेत. पाहूयात धर्मेंद्र देओल यांची फॅमिली ट्री.
धर्मेंद्र यांचा भाऊ अजित सिंह देओल यांनी चित्रपटांमध्ये नशीब आजमावलं पण त्यांना तेवढी प्रसिद्धी मिळवली नाही. 'प्रतिज्ञा', 'मेहरबानी', 'वीरता', आणि 'पुट्ट जट्ट दा' सारख्या सिनेमांत त्यांनी काम केलं. अजित सिंगचा मुलगा अभय देओल आहे. त्याने देखील अनेक सिनेमांत काम केलं. धर्मेंद्र यांचा एक चुलत भाऊ वीरेंद्र सिंग देओल देखील आहे. ज्यांनी पंजाबी चित्रपटसृष्टीत बरीच प्रसिद्धी मिळवली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
धर्मेंद्रच्या सुनांबद्दल बोलायचे झाले तर सनी देओलचे लग्न पूजा देओलशी झाले आहे. तिचं खरं नाव लिंडा देओल असून ती अँग्लो-इंडियन आहे. बॉबी देओलने 1996 मध्ये तान्या आहुजाशी लग्न केले. तान्या एक व्यावसायिक महिला आहे. त्यांना दोन मुलं आहेत. आर्यमन आणि धरम अशी त्यांची नावं आहेत. धर्मेंद्रचा नातू, करण देओल (सनीचा मुलगा), देखील विवाहित आहे. त्याने 2023 मध्ये त्याची गर्लफ्रेंड दिशा आचार्यशी लग्न केलं.
advertisement
धर्मेंद्र आणि प्रकाश कौरच्या मुलींकडे वळूया. अजिता आणि विजेता कधीही चित्रपटात दिसल्या नाहीत किंवा कधीच कॅमेऱ्यासमोर आल्या नाहीत. अजिता व्यवसायाने शिक्षिका आहे. तिचा नवरा किरण चौधरी हा एक भारतीय-अमेरिकन डेन्टिस्ट आहे. संपूर्ण कुटुंब अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे राहते. त्यांना निकिता आणि प्रियांका अशा दोन मुली आहेत. विजेताचं लग्न विवेक गिलशी झालं आहे. त्यांना एक मुलगा साहिल आणि एक मुलगी जिचं नाव प्रेरणा आहे.
advertisement
धर्मेंद्र यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं. दोघेही सिनेमाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले. धर्मेंद्र आधीच विवाहित आणि चार मुलांचा पिता होते. धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नी प्रकार कौर यांना डिवोर्स देण्यात नकार दिला. असं म्हटलं जातं की त्यांच्या दुसऱ्या लग्नासाठी धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्वीकारला हेमा यांच्या लग्न केलं. पण 2004 मध्ये या सगळ्या अफवा फेटाळून लावल्या.
advertisement
advertisement


