Ahmedabad Plane Crash : 12 सेकंदात कसा आगीचा गोळा बनलं 242 प्रवाशी असलेलं प्लेन? अहमदाबाद विमान दुर्घटनेचा थरारक VIDEO
- Published by:Priya Lad
Last Updated:
Ahmedabad Plane Crash Video : अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान उड्डाण करताच लँडिंग स्थितीत आलं आणि काही वेळातच विमान आगीच्या गोळ्यात बदललं.
अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर विमान अपघात झाला आहे. लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान उड्डाण करताच ते लँडिंग स्थितीत आलं आणि त्यानंतर काही वेळातच विमान आगीच्या गोळ्यात बदललं. याचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे.
लंडन जाणारे एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेताच अवघ्या 10 मिनिटातच विमान कोसळलं. 12 सेकंदात विमान जमिनीवर आदळले आणि काही सेकंदातच ते आगीच्या गोळ्यात रूपांतरित झाले. अपघातस्थळी धुराचे लोट स्पष्टपणे दिसत आहेत.
या विमानात 242 प्रवासी होते. यामध्ये लहान बालकांचाही समावेश आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार, 30 प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.
advertisement
टेकऑफ करताना अवघ्या 10 मिनिटांत कोसळलं विमान, अपघाताचा LIVE VIDEO pic.twitter.com/8TAjubYk6i
— News18Lokmat (@News18lokmat) June 12, 2025
विमानाचा अपघात का झाला?
अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेत असताना एअर इंडियाचे विमान कोसळले आहे. प्राथमिक तपासात विमान अपघाताचे कारण समोर आले आहे. विमानाचा मागील भाग हा जवळील इमारतीला धडकल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. काही वृत्तांनुसार विमानाचे इंजिन अचानक बिघडले, ज्यामुळे हा अपघात झाला. विमानात 242 लोक होते. अहमदाबादहून उड्डाण घेतल्यानंतर एअर इंडियाचे हे विमान लंडनला रवाना झाले होते. अपघातस्थळी धुराचे लोळ दिसून आले.
advertisement
अपघातानंतर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री आणि अहमदाबादच्या पोलिस आयुक्तांशी फोनवरून चर्चा केली आणि परिस्थितीची माहिती घेतली. अमित शहा यांनी सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले आहे.
Location :
Gujarat
First Published :
June 12, 2025 3:54 PM IST
मराठी बातम्या/देश/
Ahmedabad Plane Crash : 12 सेकंदात कसा आगीचा गोळा बनलं 242 प्रवाशी असलेलं प्लेन? अहमदाबाद विमान दुर्घटनेचा थरारक VIDEO