दिल्ली स्फोटात ‘ANFO’ स्फोटकाचा वापर; डॉ. उमर घाईघाईत मृत्यूशी खेळला, मोठी अपडेट समोर
- Published by:Ravindra Mane
- Reported by:प्रशांत लीला रामदास
Last Updated:
Delhi Red Fort Blast Update: राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या तपासात मोठा खुलासा झाला आहे. प्राथमिक तपासानुसार, या हल्ल्यात ANFO सारख्या शक्तिशाली स्फोटकाचा वापर करण्यात आला होता.
राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या तपासात मोठा खुलासा झाला आहे. प्राथमिक तपासानुसार, या हल्ल्यात अमोनियम नायट्रेट फ्युएल ऑइल अर्थात ANFO सारख्या शक्तिशाली स्फोटकाचा वापर करण्यात आला होता. फॉरेन्सिक टीमनुसार हा हाय-एक्स्प्लोसिव्ह ब्लास्ट होता, मात्र स्फोट “वरच्या दिशेने” झाल्याने जमिनीवर खड्डा निर्माण झाला नाही. सोमवारी सर्वप्रथम ही बाब उघडकीस आली होती. हा एका नव्या पद्धतीचा स्फोट होता.
तपासात समोर आलेले मुख्य नाव म्हणजे डॉ. उमर मोहम्मद... हा जम्मू काश्मीरच्या पुलवामाचा रहिवासी असून व्यावसायिक डॉक्टर आहे. तो काही काळापासून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी जोडला गेला होता. कारचा शेवटचा मालकही तोच होता आणि त्याच्याकडेच कारमध्ये स्फोटकं ठेवण्यात आली होती.
फरीदाबाद आणि जम्मू-काश्मीरमधील साथीदारांच्या अटकेनंतर तो घाबरला होता आणि लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट घाईघाईत झाल्याची शक्यता तपासातून समोर येत आहे. कारच्या व्यवहारातून तारिक दुसरे नावही समोर आले आहे. तारिक हा पुलवामा येथील रहिवासी असून त्यानेच उमरपर्यंत ही कार पोचवण्यास मदत केली आहे.
advertisement
फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी संबंध
या स्फोटाचा फरीदाबाद मॉड्यूलशी थेट संबंध असल्याचं तपासातून समोर आलं आहे. 10 नोव्हेंबर रोजी फरीदाबादमधून तब्बल 2,500 किलो स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले होते. या मॉड्यूलमध्ये अनेक डॉक्टर सहभागी होते. पुलवामा येथील रहिवासी असणारा डॉ. मुझम्मिल शकील याने फरीदाबादमध्ये स्फोटकं साठवली होती. तर अनंतनागचा रहिवासी असलेला डॉ. अदील अहमद राथर हा सोशल मीडियावरून युवकांना भडकवण्याचं काम करत होता.
advertisement
दुसरीकडे, डॉ. शाहीन शाहिद, जिने आपल्या कारमधून शस्त्रांची वाहतूक केली होती. या सर्वांचा संबंध एका विस्तृत दहशतवादी नेटवर्कशी असल्याचा पोलिसांचा संशय असून, तपास राष्ट्रीय स्तरावर सुरू आहे. शाहिना ही दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदच्या महिला विंगची भारतातील प्रमुख असून भारतात दहशतवादी नेटवर्क वाढवण्याचं काम तिला देण्यात आलं होतं, अशी माहिती समोर आली आहे.
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 11, 2025 11:53 AM IST
मराठी बातम्या/देश/
दिल्ली स्फोटात ‘ANFO’ स्फोटकाचा वापर; डॉ. उमर घाईघाईत मृत्यूशी खेळला, मोठी अपडेट समोर


