Shubhanshu Shukla Axiom 4 Mission : भारताची मोठी झेप! 41 वर्षांनी गगनवीराचं उड्डाण, शुभांशू शुक्ला मोहिमेचे कॅप्टन
- Published by:Priya Lad
Last Updated:
Shubhanshu Shukla Axiom 4 Mission : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि त्यांच्यासोबत तीन अंतराळवीर यांनी अंतराळाच्या दिशेनं झेप घेतली आहे.
नवी दिल्ली : आज भारताच्या अंतराळ प्रवासातील एक ऐतिहासिक दिवस आहे. भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र म्हणजेच आयएसएससाठी अवकाशात झेप घेतली आहे. भारतीय गगनवीर शुभांशू शुक्ला यांनी अॅक्सिओम-4 मिशनअंतर्गत उड्डाण केलं आहे. शुभांशू शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाऊल ठेवणारे पहिले भारतीय आहेत.
अॅक्सिओम-4 हे मिशन अनेक वेळा पुढे ढकलण्यात आलं आहे. मोहिमेला प्रथम हवामानामुळे विलंब झाला, नंतर फाल्कन-9 रॉकेटमध्ये गळती आणि नंतर रशियन मॉड्यूलमधील तांत्रिक समस्यांमुळे ते पुढे ढकलण्यात आलं. अलिकडेच नासा आणि रशियाची अंतराळ संस्था रोसकॉसमॉस यांनी आयएसएसच्या झ्वेझदा सर्व्हिस मॉड्यूलमधील दुरुस्तीच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर या मोहिमेला हिरवा कंदील दाखवला आहे. सहा वेळा पुढे ढकलल्यानंतर आज अखेर हे अभियान अंतिम करण्यात आलं.
advertisement
अॅक्सिओम-4 मोहिमेअंतर्गत भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि त्यांच्यासोबत तीन अंतराळवीर यांनी अंतराळाच्या दिशेनं झेप घेतली आहे. या मोहिमेचं नेतृत्व नासाचे माजी अंतराळवीर आणि अॅक्सिओम स्पेसच्या मानवी अंतराळ उड्डाण संचालक पेगी व्हिटसन करत आहेत. भारताच्या इस्रोशी संबंधित शुभांशू शुक्ला या मोहिमेत पायलटच्या भूमिकेत आहेत. या मोहिमेत पोलंडचे स्लावोस उज्नान्स्की-विस्निव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापु हे दोन अंतराळवीर देखील आहेत.
advertisement
हे सर्वजण स्पेसएक्सच्या ड्रॅगन अंतराळयानातून जात आहे. दुपारी 12:01 वाजता यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी रवाना झाला. 28 तासांच्या प्रवासानंतर भारतीय वेळेनुसार 26 जुलै संध्याकाळी 4.30 वाजता हे यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचेल. तिथं 14 दिवस राहून संशोधन करतील.
LIVE: @Axiom_Space's #Ax4 mission, with crew from four different countries, is about to launch to the @Space_Station! Liftoff from @NASAKennedy is targeted for 2:31am ET (0631 UTC). https://t.co/yBgO8bxb6Z
— NASA (@NASA) June 25, 2025
advertisement
41 वर्षांनंतर एक भारतीय अंतराळात झेपावला आहे. यापूर्वी 1984 मध्ये राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय होते. हे अभियान भारत आणि इस्रोसाठी एक ऐतिहासिक टप्पा आहे आणि जागतिक सहकार्याद्वारे अंतराळ संशोधनात नवीन आयाम उघडण्याची अपेक्षा आहे.
Location :
Delhi
First Published :
June 25, 2025 12:22 PM IST
मराठी बातम्या/देश/
Shubhanshu Shukla Axiom 4 Mission : भारताची मोठी झेप! 41 वर्षांनी गगनवीराचं उड्डाण, शुभांशू शुक्ला मोहिमेचे कॅप्टन