advertisement

Bihar Election Vote Counting: मतमोजणीच्या तासाभरात एनडीएने गाठला १०० जागांच्या आघाडीचा टप्पा, महागठबंधनची स्थिती काय?

Last Updated:

Bihar Election Vote Counting First Trend: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे.

मतमोजणीच्या तासाभरात एनडीएने गाठला १०० जागांच्या आघाडीचा टप्पा, महागठबंधनची स्थिती काय?
मतमोजणीच्या तासाभरात एनडीएने गाठला १०० जागांच्या आघाडीचा टप्पा, महागठबंधनची स्थिती काय?
पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे. निकालाच्या पहिल्या तासाभरात सत्ताधारी एनडीएने १०० जागांवरील आघाडीचा टप्पा गाठला असून बहुमताजवळ पोहचले आहेत.
बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार आपली सत्ता कायम राखणार की तेजस्वी यादव सत्तांतर घडवणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी एनडीए आणि महागठबंधन यांच्यात महत्त्वाची लढत आहे. तिसरा पक्ष जनसुराज देखील पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरलाय. बिहार विधानसभेत एकूण 243 जागा आहेत.
advertisement

एनडीएला सुरुवातीच्या कलात आघाडी....

मतमोजणीची सुरुवात पोस्टल मतांनी झाली. त्यानंतर ८.३० वाजण्याच्या सुमारास ईव्हीएमची मतमोजणी सुरू झाली. सत्ताधारी एनडीएला सुरुवातीच्या पहिल्या तासाभरात चांगलीच आघाडी मिळाली. एनडीएने सकाळी ८.५० वाजण्याच्या सुमारास ११५ जागांवर आघाडी मिळवली. भाजप ५०, जेडीयू ५० आणि इतर जागांवर मित्रपक्ष आघाडीवर होते.
advertisement
तर, दुसरीकडे राजद ३८ जागांवर आघाडीवर होते. तर इतर जागांवर काँग्रेस, डावे पक्ष आघाडीवर आहेत. प्रशांत किशोर यांच्य जनसुराज्य पक्षाचे उमेदवार दोन जागांवर आघाडीवर होते.

हॉट सीट सगळ्यांचे लक्ष...

छपरा येथे भाजपच्या छोटी कुमारी आघाडीवर आहेत, तर खेसारी लाल यादव पिछाडीवर आहेत. पटना येथे १४ पैकी ९ जागांवर एनडीए आघाडीवर आहे. गायिका मैथली ठाकूल अलीपूरमध्ये आघाडीवर आहे.  तर, दुसरीकडे तेजप्रताप यादव हे सुरुवातीच्या कलात पिछाडीवर आहेत.
advertisement
view comments
मराठी बातम्या/देश/
Bihar Election Vote Counting: मतमोजणीच्या तासाभरात एनडीएने गाठला १०० जागांच्या आघाडीचा टप्पा, महागठबंधनची स्थिती काय?
Next Article
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement