सोनिया गांधी भारताच्या नागरिक नसतानाही मतदान यादीत होते नाव, भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप

Last Updated:

Rahul Gandhi: निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षाने मिळून मतांची चोरी केली आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी करून यासंबंधीचे प्रात्याक्षिक पुरावे म्हणून सादर केले. यावरून देशभरात गदारोळ माजलेला असताना भाजप नेते मालवीय यांनी सोनिया गांधी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

सोनिया गांधी आणि अमित मालवीय
सोनिया गांधी आणि अमित मालवीय
नवी दिल्ली : मतदान प्रक्रियेतील हेराफेरी आणि मतांच्या चोरीचा मुद्दा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशभरात नेलेला असताना आणि त्यावरून निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाविरोधात ते आक्रमक झालेले असताना भाजपचे माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी अमित मालवीय यांनी सोनिया गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
सोनिया गांधी या भारताच्या नागरिक नसतानाही, त्यांचे नाव मतदान यादीत दोन वेळा आले होते, असा गंभीर आरोप अमित मालवीय यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी काही पुरावे समाज माध्यमांवरील मंचांवरुन सादर केले आहेत. अमित मालवीय यांनी बुधवारी एक्सवर पोस्ट लिहून राहुल गांधी एसआयआरला करीत असलेल्या विरोध अनाठायी असल्याचे म्हटले. राहुल गांधी करीत असलेला विरोध म्हणजे मतदान कायद्याचे स्पष्टपणे उल्लंघन आहे. ज्यांचे मतदान अवैध आहे किंबहुना अयोग्य आहे अशा लोकांचे मतदान राहण्यासाठी राहुल गांधी का आग्रही आहेत? असा सवाल अमित मालवीय यांनी विचारला आहे.
advertisement

सोनिया गांधी यांचे नाव १९८० साली मतदान यादीत

मालवीय यांनी दावा केल्यानुसार, १९८० साली सोनिया गांधी यांचे नाव मतदान यादीत पहिल्यांदा सहभागी झाले, ज्यावेळी त्या इटलीच्या नागरिक होत्या. त्यावेळी त्यांना भारताचे नागरिकत्व मिळाले नव्हते. त्यावेळी गांधी कुटुंब सफदरजंग रस्ता, पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी राहत होते. याच पत्त्यावर मतदार म्हणून इंदिरा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी, मनेका गांधी यांची नावे होती. परंतु १९८० मध्ये दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या मतदारयादीचे पुर्नपरिक्षण झाले, त्यावेळी १ जानेवारी १९८० ला सोनिया गांधी यांचे नाव १४५ क्रमाकांच्या मतदान केंद्रावर ३८८ क्रमांकावर नोंदवले गेले.
advertisement
मालवीय यांच्या म्हणण्यांनुसार, १९८२ साली यावरून वादविवाद झाल्यानंतर त्यांचे नाव हटविण्यात आले, परंतु १ जानेवारी १९८३ साली पुन्हा त्यांचे नाव नोंदवले गेले. यावेळी मात्र मतदान केंद्र क्रमांक १४० च्या २३६ क्रमांकावर त्यांचे नाव नोंद झाले. महत्त्वाचे म्हणजे सोनिया गांधी यांना ३० एप्रिल १९८३ साली भारतीय नागरिकत्व प्राप्त झाले. याचाच अर्थ सोनिया गांधी २९ एप्रिल १९८३ पर्यंत भारतीय नागरिक नव्हत्या, तरीही त्यांचे नाव मतदान यादीत होते.
advertisement

सोनिया गांधी यांचे लग्न १९६८ साली झालेले असताना लग्नाच्या तब्बल १५ वर्षानंतर नाव का नोंदवले?

तसेच सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांचे लग्न देश१९६८ साली झालेले असताना लग्नाच्या तब्बल १५ वर्षानंतर सोनिया गांधी यांनी नागरिकत्व का घेतले? असा सवाल करीत एकाच व्यक्तीचे नाव दोन वेळा मतदान यादीत कायदा पायदळी तुडवून नोंदविण्यात आले हा प्रकार निवडणुकीत फेरफार केल्याचा नव्हता का? असा सवाल मालवीय यांनी विचारला.
view comments
मराठी बातम्या/देश/
सोनिया गांधी भारताच्या नागरिक नसतानाही मतदान यादीत होते नाव, भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement