BJP Congress Clash : दगडफेक, गाड्या फोडल्या, तुफान राडा, भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस कार्यालयावर हल्ला
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
BJP Congress Clash : राहुल गांधी हे बिहारमध्ये वोट अधिकार यात्रा काढत असताना दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर हल्ला केल्याची घटना घडली.
पाटणा: देशाचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस नेते राहुल गांधी हे बिहारमध्ये वोट अधिकार यात्रा काढत असताना दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर हल्ला केल्याची घटना घडली. काँग्रेसच्या सभेत पंतप्रधान मोदी यांच्या दिवंगत आईबद्दल अपशब्द काढल्याच्या वादातून हा तुफान राडा झाला. काँग्रेस कार्यालयाच्या आवारात असलेल्या वाहनांची तोडफोड झाली असल्याचे काँग्रेसने म्हटले.
advertisement
बिहारमध्ये राहुल गांधी यांच्या सुरू असलेल्या वोट अधिकार यात्रेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आई यांच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याचे प्रकरण आता अधिकच तीव्र होत आहे. या मुद्द्यावर एनडीए नेते राहुल गांधी आणि काँग्रेसवर सतत हल्ला करत आहेत. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आई यांच्याविरुद्ध वापरल्या गेलेल्या अपमानास्पद शब्दांवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
advertisement
बिहारची राजधानी पाटणा येथील काँग्रेसचे राज्य कार्यालय असलेल्या सदाकत आश्रमात शुक्रवारी भाजप कार्यकर्त्यांनी दगडफेक आणि तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे.
पाटणा येथील काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर तुफान दगडफेक केली. भाजप कार्यकर्त्यांच्या आक्रमक पावित्र्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांकडूनही घोषणाबाजी सुरू झाली. आक्रमक झालेल्या भाजपच्या काही समर्थकांनी गेट तोडून कार्यालयात प्रवेश केला. आवारात गेल्यानंतरही दगडफेक सुरूच होती. काही कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात आवारात उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले.
advertisement
#WATCH | Patna, Bihar: BJP and Congress workers clash as the former staged a protest against the latter in front of the Congress office. pic.twitter.com/p1tt2bytzD
— ANI (@ANI) August 29, 2025
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, काही भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर हल्ला केला, परिसरात उभ्या असलेल्या ट्रकच्या काचा फोडल्या आणि मतदार हक्क यात्रेचे पोस्टर्स फाडले. काँग्रेसविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. भाजप कार्यकर्त्यांकडून दगडफेकही करण्यात आली. हल्लेखोरांनी काँग्रेसचा झेंडाही फाडला आणि फेकून दिला.
advertisement
भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याला प्रत्त्युतर देण्याचा प्रयत्न काँग्रेसी कार्यकर्त्यांनी केला. भाजप-काँग्रेसमधील राड्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
Location :
Bihar
First Published :
August 29, 2025 3:08 PM IST
मराठी बातम्या/देश/
BJP Congress Clash : दगडफेक, गाड्या फोडल्या, तुफान राडा, भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस कार्यालयावर हल्ला