गर्लफ्रेंडला पळवलं, लग्नही केलं... पण कोर्ट मॅरेजवेळी शॉकिंग ट्विस्ट, मोठ्या भावालाच दिली स्वतःची बायको!

Last Updated:

एक मुलगी... दोन लग्न आणि कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी पळत असलेला प्रियकर... कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी प्रियकराने केलेल्या धक्कादायक कृत्यामुळे पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली आहे.

गर्लफ्रेंडला पळवलं, लग्नही केलं... पण कोर्ट मॅरेजवेळी शॉकिंग ट्विस्ट, मोठ्या भावालाच दिली स्वतःची बायको! (AI Image)
गर्लफ्रेंडला पळवलं, लग्नही केलं... पण कोर्ट मॅरेजवेळी शॉकिंग ट्विस्ट, मोठ्या भावालाच दिली स्वतःची बायको! (AI Image)
एक मुलगी... दोन लग्न आणि कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी पळत असलेला प्रियकर... कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी प्रियकराने केलेल्या धक्कादायक कृत्यामुळे पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली आहे. अल्पवयीन प्रियकराने कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी आपल्या प्रेयसीचे लग्न त्याच्याच आत्येभावासोबत लावून दिलं. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी कारवाई केली आहे. जवळजवळ दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या मुलीला शोधून काढल्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि संपूर्ण कट उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी असलेला प्रियकर हिमांशूसह एकूण पाच जणांना अटक केली आहे.
27 सप्टेंबर रोजी एका शेतकऱ्याने आपल्या मुलीच्या अचानक घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. शेजारच्या गावातील तीन तरुणांवर तिला फसवल्याचा आरोप करत वडिलांनी गुन्हा दाखल केला. गुप्त माहितीवरून कारवाई करताना, पोलिसांनी शनिवारी घरावर छापा टाकला आणि मुलीला तिचा प्रियकर हिमांशू आणि त्याच्या साथीदारासह पकडलं. चौकशी सुरू झाल्यावर, मुलीने असे गुपिते उघड केले की पोलीसांनाही धक्का बसला.
advertisement

भावासोबत लग्न लावलं

चौकशीदरम्यान, मुलीने सांगितले की, ती हिमांशूसोबत घर सोडून गेली होती. त्यांनी 11 नोव्हेंबर रोजी अलाहाबाद (प्रयागराज) येथील एका मंदिरात लग्नही केले होते. पण दोघंही कोर्ट मॅरेजसाठी गाझियाबाद कोर्टात पोहोचले, तेव्हा याप्रकरणाला वेगळं वळण लागलं. कायदेशीर कारवाईदरम्यान प्रेयसी प्रौढ आहे, पण तिचा प्रियकर हिमांशू अद्याप 21 वर्षांचा नसल्याचं समोर आलं.
advertisement
कायद्यानुसार लग्नासाठी पुरूषाचे वय 21 वर्षे असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेमुळे, वकिलाने त्यांचे कोर्ट मॅरेज करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर तरुणाला भीती वाटू लागली की त्याच्या प्रेयसीचे कुटुंब त्याला अपहरण आणि लैंगिक शोषण प्रकरणात अडकवू शकते. कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी, हिमांशूने एक धूर्त योजना आखली. 4 डिसेंबर रोजी, त्याने त्याच्या प्रेयसीचे लग्न त्याचा आत्येभाऊ चिरागसोबत गाझियाबाद कोर्टात लावले.
advertisement
या लग्नाचा एकमेव उद्देश म्हणजे मुलीला प्रौढ व्यक्तीशी विवाहित असल्याचे दाखवून कायदेशीर गुंतागुंतीपासून स्वतःचे रक्षण करणे. पण, पोलिसांनी संपूर्ण प्रकरणासंदर्भात हिमांशू, त्याचा आत्येभाऊ चिराग आणि इतर तीन साथीदारांना अटक केली आहे. अटक केलेल्यांविरुद्ध अपहरण, बेकायदेशीर विवाह आणि कायदेशीर कारवाईत अडथळा आणणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा आत्येभाऊ चिराग देखील या कटात पूर्णपणे सहभागी होता का याचा तपास पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/देश/
गर्लफ्रेंडला पळवलं, लग्नही केलं... पण कोर्ट मॅरेजवेळी शॉकिंग ट्विस्ट, मोठ्या भावालाच दिली स्वतःची बायको!
Next Article
advertisement
Gold Price Prediction 2026: ...तर, २०२६ मध्ये सोनं होणार २० टक्क्यांनी स्वस्त! 'या' एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

View All
advertisement