Chandrayaan-3: चांद्रयान-3 ची मोठी अपडेट, चंद्रावरच्या विक्रम आणि प्रज्ञानसोबत ISRO चा संपर्क, मग काय झालं?
- Published by:Shreyas
Last Updated:
चंद्रावर आराम करणाऱ्या चांद्रयान-3 चे लँडर विक्रम आणि रोवर प्रज्ञानबद्दल इस्रोने नवीन अपडेट दिली आहे. लँडर विक्रम आणि रोवर प्रज्ञानसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला गेला.
मुंबई, 22 सप्टेंबर : चंद्रावर आराम करणाऱ्या चांद्रयान-3 चे लँडर विक्रम आणि रोवर प्रज्ञानबद्दल इस्रोने नवीन अपडेट दिली आहे. लँडर विक्रम आणि रोवर प्रज्ञानसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला गेला, पण आतापर्यंत यात यश आलं नाही, असं इस्रोने त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणलं आहे. चांद्रयान-3 चे विक्रम आणि प्रज्ञान हे दोघं जागे व्हायच्या अवस्थेमध्ये आहेत का नाही? याची माहिती घेण्यासाठी इस्रोकडून हा संपर्क करण्यात आला होता. भारताने 23 ऑगस्टला चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करत इतिहास घडवला होता. चंद्रावर पोहोचणारा भारत चौथा देश ठरला होता, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातला पहिलाच देश बनला.
इस्रोचे माजी अध्यक्ष के. सिवन म्हणाले की लँडर आणि रोव्हरला जागं करण्याच्या प्रयत्नात अनेक नवीन गोष्टी समोर येतील अशी आशा आहे. “आम्हाला वाट बघावी लागेल. ती लुनार रात्र गेली. आता लुनार दिवस सुरू होतो. त्यामुळे आता तो जागं होण्याचा प्रयत्न करेल. सर्व यंत्रणा कार्यान्वित झाल्या तर ठीक होईल...पण तसं झालं नाही तरीही हरकत नाही. भविष्यात नवीन वैज्ञानिक पद्धती विकसित होतील. आताही चांद्रयान-1 च्या डेटाने अनेक शोध लावले आहेत. त्यामुळे अनेक नवीन गोष्टी समोर येतील अशी आशा आहे. शास्त्रज्ञ प्रयत्न करत राहतील. त्यामुळे, हा कथेचा शेवट नाही,” असं ते म्हणाले.
advertisement
Chandrayaan-3 Mission:
Efforts have been made to establish communication with the Vikram lander and Pragyan rover to ascertain their wake-up condition.As of now, no signals have been received from them.
Efforts to establish contact will continue.
— ISRO (@isro) September 22, 2023
advertisement
इस्रोने एक्सवर पोस्ट केली आहे. "आज चंद्रावरील शिवशक्ती पॉइंटवर सूर्योदय होणं अपेक्षित आहे आणि लवकरच विक्रम आणि प्रज्ञान यांना वापरण्यायोग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळेल. आम्ही विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर 22 सप्टेंबर रोजी त्यांच्याशी पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू करण्यापूर्वी एका विशिष्ट तापमानापेक्षा जास्त गरम होण्याची प्रतीक्षा करू," असं त्यात म्हटलं आहे.
advertisement
भारताचे चांद्रयान-3 हे 14 जुलै रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. 23 ऑगस्ट रोजी ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले. तेव्हापासून, प्रज्ञान आणि विक्रम या दोघांनी इस्रोकडे खूप सारा डेटा पाठवला आहे, त्यापैकी काही डेटा इस्रोने सार्वजनिक केला. मिशनच्या यशानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात विक्रम लँडरचा लँडिंग पॉइंट 'शिवशक्ती' म्हणून ओळखला जाईल, अशी घोषणा केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 22, 2023 11:09 PM IST
मराठी बातम्या/देश/
Chandrayaan-3: चांद्रयान-3 ची मोठी अपडेट, चंद्रावरच्या विक्रम आणि प्रज्ञानसोबत ISRO चा संपर्क, मग काय झालं?