Chandrayaan 3 : रोव्हर प्रज्ञानचं चंद्रावर पहिलं पाऊल, फोटो आला समोर; इस्रोने दिले अपडेट

Last Updated:

Chandrayaan 3 : चंद्रावर उतरल्यानंतर आता लँडरमधून रोव्हर प्रज्ञानसुद्धा चंद्राच्या जमीनीवर उतरला असल्याची आनंदाची बातमी इस्रोने दिलीय.

News18
News18
दिल्ली, 24 ऑगस्ट : भारतीय अंतराळ संस्था इस्रोने बुधवारी इतिहास घडवत चंद्रावर लँडर विक्रमचे सॉफ्ट लँडिंग यशस्वी केले. यानंतर आता लँडरमधून रोव्हर प्रज्ञानसुद्धा चंद्राच्या जमीनीवर उतरला असल्याची आनंदाची बातमी इस्रोने दिलीय. रोव्हर प्रज्ञान हे ६ चाकांचे एक रोबोटिक व्हेइकल आहे. ते चंद्राच्या भूमीवर उतरल्यानंतर फिरेल आणि फोटो काढेल. रोव्हरवर इस्रोचा लोगो आणि भारताचा तिरंगासुद्धा आहे.
advertisement
रोव्हरने चंद्रावर उतरताच मेसेजही पाठवला असून मेड इन इंडिया, मेड फॉर द मून असा मेसेज रोव्हरने दिल्याचं इस्रोने म्हटलंय. रोव्हर शिडीवरून चंद्रावर उतरला असून चंद्रावर फिरला असल्याचंही इस्रोने अपडेट देताना सांगितले.
advertisement
चंद्रावर लँडरने लँडिंग केल्यानंतर चार तासांनी रोव्हर प्रज्ञान बाहेर निघाला. प्रज्ञानचे स्पीड हे प्रतीसेकंद एक सेंटिमीटर इतकं आहे. यावेळी कॅमेऱ्याच्या मदतीने रोव्हर चंद्राचे फोटो टिपेल .चंद्रावरील हवामानाचीसुद्धा माहिती रोव्हर देईल. याशिवाय चंद्राच्या भूमीवर असलेल्या इयॉन्स आणि इलेक्ट्रॉन्सच्या प्रमाणाचाही शोध रोव्हर घेईल.
view comments
मराठी बातम्या/देश/
Chandrayaan 3 : रोव्हर प्रज्ञानचं चंद्रावर पहिलं पाऊल, फोटो आला समोर; इस्रोने दिले अपडेट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement