Chandrayaan-3: लँडर अन् रोव्हरचा सिग्नल आला नाही, पण....; इस्रोला अजूनही आशा
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
विक्रम लँडर आणि रोव्हर यांना स्लीपमोडमधून जागं करण्याची तयारी केली जात आहे. मात्र ते ऑटोमॅटिक आहेत आणि स्वत:च जागे होतील.
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने चांद्रयान ३ बाबत अपडेट दिले आहेत. लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान मिशन पूर्ण केल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला स्लीप मोडमध्ये टाकले होते. चंद्रावर भयंकर थंडी आणि तापमान कमी असल्याने आता लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान सिग्नल पाठवतील अशी आशा आता इस्रोला आहे.
इस्रोच्या प्रमुख केंद्रापैकी एक अंतराळ प्रयोग केंद्राचे संचालक निलेश एम देसाई यांनी शुक्रवारी सांगितलं की, विक्रम लँडर आणि रोव्हर यांना स्लीपमोडमधून जागं करण्याची तयारी केली जात आहे. मात्र ते ऑटोमॅटिक आहेत आणि स्वत:च जागे होतील. इस्रो त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. जर ते जागे झाले तर सिग्नल मिळेल पण अद्याप असं झालेलं नाही.
advertisement
आशा होती की चंद्रावर सुर्योदयानंतर २२ सप्टेंबरला सौर उर्जेवर चालणारे लँडर आणि रोव्हर चार्ज होताच सिग्नल मिळेल. पण अद्याप कोणताही सिग्नल मिळालेला नाही. चांद्रयान ३च्या लँडर विक्रम आणि रोव्हरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. चंद्रावर रात्र सुरू होण्याआधी लँडर आणि रोव्हर दोन्हींना या महिन्याच्या सुरुवातीला ४ आणि २ सप्टेंबरला स्लीपमोडमध्ये टाकलं होतं.
advertisement
देसाई यांनी सांगितले की, नवे संकेत मिळताच माहिती दिली जाईल. लँडर आणि रोव्हर पुन्हा जागे होण्याची शक्यता 50-50 टक्के आहे. इलेक्ट्रॉनिक्स थंड वातवरणात सुरक्षित राहिले तर आपल्याला त्यांचे सिग्नल मिळतील. नाही मिळाले तरी लँडर आणि रोव्हरने त्यांचे काम आधीच पूर्ण केले आहे.
लँडर आणि रोव्हर पुन्हा जागे झाले तर चंद्राच्या भूमीवर प्रयोग सुरूच राहतील. दरम्यान, पद्मश्री पुरस्कार विजेते आणि इस्रोचे माजी वैज्ञानिक माइलस्वामी अन्नादुराई यांनी चांद्रयान ३ च्या विक्रम आणि प्रज्ञान यांना जागे करण्याच्या इस्रोच्या प्रयत्नाबाबत म्हटलं की, मी प्रज्ञानबाबत खूपच आशावादी आहे. कारण याची चाचणी करणं बाकी आहे. पण लँडरबाबत आपल्याला वाट बघावी लागेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 23, 2023 10:30 PM IST