हा देश डरपोक लोकांच्या हाती जास्त दिवस राहत नाही, प्रियांका गांधींचे संसदेत पहिलेच वादळी भाषण
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Priyanka Gandhi Speech In Lok Sabha: भारतीय राज्यघटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संसदेतील खास चर्चेत प्रियांका गांधी यांनी सहभाग नोंदवला.
नवी दिल्ली : आपल्या देशात संवादाची परंपरा आहे. वेगवेगळ्या धर्मांत देखील वादविवाद, चिंतन मंथन अशी जुनी संस्कृती सांगितली आहे. याच परंपरेच्या आधारावर स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास लढला गेला. ही लढाई लढत असताना आपण कायमच अहिंसेच्या मार्गाचा अवलंब केला. ही लढाई केवळ इंग्रजांनी देशाबाहेर जावे, यासाठी नव्हती तर राजकारण, समाजकारण आणि आर्थिक न्यायाची लढाई पण लढत होतो आणि याच लढाईला संविधानाने ठोस 'आवाज' दिला, अशा शब्दात भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित करून हा देश डरपोक लोकांच्या हाती जास्त दिवस राहत नाही, असा हल्लाबोल काँग्रेस नेत्या तथा वायनाडच्या नवनिर्वाचित खासदार प्रियांका गांधी यांनी केल्या. प्रियांका यांच्या संसदेतील पहिल्याच भाषणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले होते.
भारतीय राज्यघटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संसदेतील खास चर्चेत प्रियांका गांधी यांनी सहभाग नोंदवला. भारतीय संविधानाचे महत्व देशातील जनतेसाठी नेमके काय आहे, हे विषद करताना त्यांनी मागील दोन वर्षांतील लोकांच्या घेतलेल्या गाठीभेटी, त्यांची न्यायासाठी सुरू असलेली लढाई आणि संविधानावरचा त्यांचा अढळ विश्वास अधोरेखित केला. त्यांचे संपूर्ण भाषण काँग्रेस सदस्य कानात प्राण आणून ऐकत होते. त्यांचे भाषण ऐकायला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह विशेष उपस्थित होते.
advertisement
सर्व जबाबदारी नेहरूंची आहे काय?- प्रियांका गांधी
जेव्हा जातीच्या जनगणनेचा प्रश्न येतो तेव्हा त्यांची उत्तरे पहा, ते म्हशी चोरतील, ते मंगळसूत्र चोरतील. तुम्ही महिला शक्ती विधेयक आणले असताना त्याची अंमलबजावणी लगोलग का केली नाही? समोर बसलेले माझे सहकारी नेहमी भूतकाळाबद्दल बोलतात.मग तुम्ही नेमके काय करत आहात, तुमची जबाबदारी काय आहे. सर्व जबाबदारी नेहरूंची आहे का? अशी विचारणा प्रियांका गांधी यांनी केली.
advertisement
...तर सत्ताधाऱ्यांनी संविधान बदण्याचे काम केले असते!
सत्ताधारी पक्षातील सहकाऱ्यांनी संविधानाचे संरक्षण कवच तोडण्याचे आश्वासन दिले आहे. हे सरकार आरक्षण कमकुवत करण्याचे काम करत आहे. हे निकाल लोकसभेत आले नसते तर त्यांनी संविधान बदलण्याचे काम केले असते.
Location :
New Delhi,New Delhi,Delhi
First Published :
December 13, 2024 2:10 PM IST
मराठी बातम्या/देश/
हा देश डरपोक लोकांच्या हाती जास्त दिवस राहत नाही, प्रियांका गांधींचे संसदेत पहिलेच वादळी भाषण