Cyclone Michaung : या 2 राज्यांमध्ये धडकणार मिचॉन्ग चक्रीवादळ, मुसळधार पावसाचा इशारा, 144 ट्रेन रद्द
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वेने 144 गाड्या रद्द केल्या आहेत. यातील 118 गाड्या लांब पल्ल्याच्या आहेत
नवी दिल्ली 04 डिसेंबर : भारतीय हवामान विभागाने (IMD) आंध्र प्रदेश आणि लगतच्या तमिळनाडू किनारपट्टीसाठी चक्रीवादळाचा इशारा जारी केला आहे. या वादळाला मिचॉन्ग असं नाव देण्यात आलं आहे. आज दुपारपर्यंत ते आंध्र प्रदेश आणि लगतच्या उत्तर तामिळनाडू किनार्याजवळ पोहोचेल. त्यानंतर मिचॉन्ग चक्रीवादळ 5 डिसेंबरला आंध्र प्रदेशात धडकेल.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वेने 144 गाड्या रद्द केल्या आहेत. यातील 118 गाड्या लांब पल्ल्याच्या आहेत. भारतीय हवामान विभागाने चक्रीवादळ माइचोंगबाबत अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडुत पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. 4 डिसेंबरला म्हणजेच आज तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला चक्रीवादळ मिचॉन्ग धडकण्याची शक्यता आहे. तर तामिळनाडुची उत्तर किनारपट्टी, पुद्दुचेरी, कराइकलच्या नागरिकांना 4 डिसेंबरला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
चक्रीवादळ मिचॉन्ग हिंदी महासागरातलं यंदाच्या वर्षातलं सहावं तर बंगालच्या खाडीतलं चौथं वादळ आहे. या चक्रीवादळाला म्यानमारने नावं दिलं होतं. हवामान विभागाने अंदमान, निकोबार बेटासह ओडिशात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान 5 डिसेंबरच्या दुपारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळाचा कमाल वेग ताशी 80 ते 90 किमीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
advertisement
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी शुक्रवारी 12 जिल्हा प्रशासन प्रमुखांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी यावेळी अवश्यक अशा सूचना दिल्या. यासोबतच सर्व संबंधित अधिकाऱ्यांना खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 04, 2023 7:05 AM IST
मराठी बातम्या/देश/
Cyclone Michaung : या 2 राज्यांमध्ये धडकणार मिचॉन्ग चक्रीवादळ, मुसळधार पावसाचा इशारा, 144 ट्रेन रद्द