वकील झाला आऊट ऑफ कंट्रोल, हायकोर्टाच्या सुनावणीवेळी Live रोमान्स, कॅमेरासमोर महिलेला केलं Kiss!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
दिल्ली उच्च न्यायालयाच्या व्हर्च्युअल कामकाजाआधी एका वकिलाचा लाईव्ह रोमान्स कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाच्या व्हर्च्युअल कामकाजाआधी एका वकिलाचा लाईव्ह रोमान्स कॅमेरामध्ये कैद झाला आहे. हा वकील कॅमेरा सुरू असतानाच महिलेचं चुंबन घेत होता. वकिलाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसंच वकिलाच्या या कृत्यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना एका खटल्याच्या ऑनलाईन सुनावणीवेळी घडली आहे, जी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चालवली जात होती.
ही घटना मंगळवारी घडली आहे. न्यायाधीश सुनावणीसाठी दाखल झाले नव्हते, त्यामुळे लोक त्यांच्या येण्याची वाट पाहत होते, तेव्हाच वकिलाने महिलेचं चुंबन घेतलं. आपला व्हिडिओ सुरू असल्याचं हा वकील विसरला आणि त्यानंतर सगळा घोळ झाला.
फुटेजमध्ये वकील न्यायालयीन पोशाखात त्याच्या खोलीत बसलेला दिसत आहे. हा वकील कॅमेऱ्यापासून थोडा दूर उभा होता आणि त्याच्या चेहऱ्याची फक्त एक बाजू दिसत होती.
advertisement
Welcome to Digital India Justice
Court is online… but judge forgot it’s LIVE!
When tech meets tradition
— and the camera off button loses the case! pic.twitter.com/1GbfOFQ6w7
— ShoneeKapoor (@ShoneeKapoor) October 15, 2025
दुसरीकडे साडी घातलेली एक महिला त्याच्यासमोर उभी असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर वकील महिलेचा हात धरून तिला जवळ ओढतो. ही महिला संकोच करत असल्याचे आणि प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे, पण वकील तिला चुंबन देऊन पुढे जातो आणि ती मागे सरकते.
advertisement
व्हिडिओमधील वकील आणि महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. न्यूज18 व्हायरल फुटेजच्या सत्यतेची खात्री देत नाही.
सोशल मीडियाच्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ सोशल मीडियावर लगेचच व्हायरल झाला, आणि यावर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रियाही आल्या. यूजर्सनी हा प्रकार निषेधार्ह, लाजिरवाणा आणि संतापजनक असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
view commentsLocation :
New Delhi,Delhi
First Published :
October 16, 2025 5:19 PM IST
मराठी बातम्या/देश/
वकील झाला आऊट ऑफ कंट्रोल, हायकोर्टाच्या सुनावणीवेळी Live रोमान्स, कॅमेरासमोर महिलेला केलं Kiss!