शिक्षकांकडून अमानुष छळ, सांगलीच्या शौर्याने दिल्लीत केला भयावह शेवट, मन हेलावणारी चिठ्ठी

Last Updated:

दहावीत शिक्षण घेत असलेल्या एका मराठी विद्यार्थ्याने राजधानी दिल्लीत मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून रस्त्यावर उडी मारत आयुष्याचा शेवट केला आहे.

News18
News18
दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून दहावीत शिकत असलेल्या मराठी विद्यार्थ्याने मंगळवारी मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केली. शौर्य प्रदीप पाटील असे पीडित विद्यार्थ्यांचे नाव असून तो नवी दिल्लीतील राजीवनगर भागात राहत होता.
शौर्य हा मूळचा सांगली जिह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा रहिवासी आहे. त्याचे वडील प्रदीप पाटील हे सोने-चांदी गलाई व्यवसाय निमित्त गेल्या अनेक वर्षापासून दिल्ली येथे स्थायिक आहेत. त्यामुळे शौर्य हा त्यांच्या कुटुंबीयांसह दिल्लीतील राजीव नगर भागात भागात वास्तव्यास होता. तो दिल्लीतील सेंट कोलंबस विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता.
मंगळवारी १८ नोव्हेंबर रोजी राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून त्याने खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केली. शिक्षिकांनी मानसिक छळ केल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे, असे शौर्य याने दीड पानाच्या सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे. राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी प्रिन्सिपल अपराजिता पाल आणि मनू कालरा, युक्ती महाजन आणि ज्युली व्हर्गिस या शिक्षिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. जखमी अवस्थेतील शौर्य यास पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शौर्य याचे वडील कामानिमित्त गावी ढवळेश्वरला आले होते. याची माहिती त्यांना मिळाल्यानंतर ते तातडीने दिल्ली येथे पोहोचले. आज त्याच्यावर गावी अंत्यसंस्कार होणार आहेत.
advertisement

स्कूल बॅगमध्ये सापडली सुसाईड नोट

दिल्ली पोलिसांना शौर्य पाटील याच्या स्कूल बॅगमध्ये सुसाइड नोट सापडली. त्यात 'मेरा नाम शौर्य पाटील हैं... इस मोबाइल... नंबर पर कॉल कर देना प्लीज... आय अॅम व्हेरी सॉरी... आय डीड धीस... पर स्कूलवालोंने इतना बोला की, मुझे यह करना पडा. यदी किसी को जरूरत हो तो मेरे अंग दान कर देना. मेरे पॅरेंटसने बहुत कुछ किया, आय अॅम सॉरी, मैं उनको कुछ नहीं दे पाया... सॉरी भैय्या... सॉरी मम्मी, आपका आखरी बार दिल तोड रहा हूं... स्कूल की टीचर है ही ऐसी क्या बोलू.... असा उल्लेख होता
view comments
मराठी बातम्या/देश/
शिक्षकांकडून अमानुष छळ, सांगलीच्या शौर्याने दिल्लीत केला भयावह शेवट, मन हेलावणारी चिठ्ठी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement