उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटी दौऱ्यावर, कामाख्या देवीच्या परिसरातला VIDEO समोर
- Published by:Sachin S
Last Updated:
राज्यात एकीकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची धामधूम सुरू आहे. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या गुवाहाटीच्या दौऱ्यावर आहे
गुवाहाटी: शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. राज्यात ठिकठिकाणी एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे. पण, यावेळी राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनामुळे एकनाथ शिंदे यांनी वाढदिवसाला हार तुरे, बॅनरबाजी करण्यास कार्यकर्त्यांना मनाई केली आहे. एकनाथ शिंदे सध्या गुवाहाटी दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांचा व्हिडीओ समोर आला आहे.
राज्यात एकीकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची धामधूम सुरू आहे. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या गुवाहाटीच्या दौऱ्यावर आहे. शिंदे यांचा हा नियोजित दौरा होता.
सकाळीच एकनाथ शिंदे हे गुवाहाटीमध्ये दाखल झाले. माता कामाख्या देवी मंदिराला भेट दिली आणि देवीचं दर्शन घेतलं. यावेळी मंदिर परिसरात फिरत असताना एकनाथ शिंदे यांचा व्हिडीओ समोर आला आहे.
advertisement
दरम्यान, आसामचे सध्याचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलं. एकनाथ शिंदे यांचं वाढदिवसानिमित्ताने अभिनंदन केलं आणि भेट वस्तूही दिली.
सिद्धीविनायक मंदिरात आरती
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असून त्या निमित्त आज शिवसेनेच्या वतीने सिद्धी विनायक मंदिरात विशेष आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे एकनाथ शिंदे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे कोणताही जल्लोष न करता सिद्धीविनायक बाप्पांच्या चरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उदंड आयुष्य लाभण्याची प्रार्थना शिवसैनिकांनी केली.
Location :
Guwahati [Gauhati],Kamrup Metropolitan,Assam
First Published :
Feb 09, 2026 12:48 PM IST
मराठी बातम्या/देश/
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटी दौऱ्यावर, कामाख्या देवीच्या परिसरातला VIDEO समोर








