ट्रेन- ट्रॅक्टर-ट्रॉलीची भीषण धडक, भयंकर आवाज अन् तुकडे हवेत उडाले, थरकाप उडवणारा VIDEO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
रेल्वेने ट्रॅक्टर-ट्रॉलीला चिरडले; जोरदार आवाजाने परिसर दणाणला, हजारो प्रवाशांचा जीव टांगणीला, थोडक्यात मोठा अनर्थ टळला, नेमकं काय घडलं VIDEO आला समोर
रेल्वे ट्रॅक ओलांडू नये हे वारंवार सांगितल्यानंतरही बऱ्याचदा याकडे कानाडोळा करून मनमानी केली जाते, रेल्वे ट्रॅक ओलांडणाऱ्या ट्रॅकरसोबत भयंकर झालं आहे. भरधाव एक्सप्रेसनं ट्रॅक्टर ट्रॉलीला उडवलं. ही धडक इतकी भीषण आणि जोरदार होती, की ट्रॅक्टर ट्रॉलीचे तुकडे तुकडे झाले, हे तुकडे अक्षरश: हवेत उडून खाली पडले, ट्रेनमधील प्रवाशांना डोळ्यादेखत मृत्यू पाहिला, हा अपघात इतका भयंकर होता की ट्रॅक्टर ट्रॉलीचा चुराडा झाला.
कसा झाला अपघात?
रेल्वे रुळ ट्रॅक्टर चालकाने घाईघाईत ओलांडण्याचा प्रयत्न केला. अखेर त्याचा फटका त्याला बसला, ट्रॅक्टर ट्रॅकच्या मधोमध पोहोचला असतानाच, समोरून भरधाव वेगाने ट्रेन येत असल्याचे पाहून ट्रॅक्टरचा चालक घाबरला. त्याने तात्काळ ट्रॅक्टर-ट्रॉली तिथेच सोडून स्वतः उडी मारून पळ काढला. ट्रॅकवर अचानक ट्रॅक्टर-ट्रॉली उभी असल्याचे पाहून ट्रेनच्या लोको पायलट यांनी तातडीने ट्रेनचा वेग कमी केला. मात्र, वेग कमी करूनही ट्रेनची ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक बसली.
advertisement
प्रवाशांचा जीव धोक्यात
या धडकेनंतर मोठा धमाक्यासारखा आवाज झाला आणि ट्रॅक्टर-ट्रॉलीचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले. हे तुकडे उंच हवेत उडाले आणि खाली कोसळले. अपघाताचा हा थरार प्रवाशांनी डोळ्याने पाहिला. ट्रेनचा वेग कमी केल्यामुळे ती रुळावरून खाली उतरण्यापासून वाचली, पण जोरदार आवाजामुळे ट्रेनमध्ये प्रवास करणारे प्रवासी घाबरले आणि त्यांनी लगेच ट्रेनमधून बाहेर धाव घेतली. ही संपूर्ण घटना थरारक होती.
advertisement
व्हिडीओ
बीकानेर के बेनीसर (श्रीडूंगरगढ़) स्टेशन के पास रेलवे ट्रैक पार करते समय ट्रैक्टर-ट्रॉली ट्रेन से टकराई ।।#Railway #Bikaner #Rajasthan pic.twitter.com/ZWbzyntDMr
— BikaneriMirch (@BikaneriMirch) November 17, 2025
पोलिसांकडून कारवाई
अपघाताची माहिती तात्काळ रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. काही वेळातच जवळच्या स्टेशनवरून जीआरपी (GRP) पोलीस आणि रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तुटलेली ट्रॅक्टर-ट्रॉली ट्रॅकवरून बाजूला केली. या अपघातामुळे सुदैवाने कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला. सध्या जीआरपी पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
advertisement
कुठे घडली घटना?
view commentsही धक्कादायक घटना राजस्थानच्या बीकानेरमध्ये घडली. रविवारी दिल्लीहून बीकानेरला जाणाऱ्या सुपरफास्ट एक्सप्रेसला ट्रॅक्टर धडकला आणि हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. बीकानेरहून दिल्लीकडे जाणारी गाडी क्रमांक २२४७२ दिल्ली-बीकानेर सुपरफास्ट ट्रेन बेनीसर स्टेशन क्रॉस करून श्रीडूंगरगढ स्टेशनकडे जात असताना एका रेल्वे फाटकाजवळ ट्रॅक्टर-ट्रॉली ट्रॅकवर उभी होती. या ठिकाणी रेल्वे फाटकाला कोणताही गेट किंवा संरक्षक नव्हता. याच संधीचा फायदा घेऊन ट्रॅक्टर चालकाने घाईघाईत रेल्वे ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न केला आणि तिथेच घात झाला.
Location :
Rajasthan
First Published :
November 17, 2025 9:55 AM IST
मराठी बातम्या/देश/
ट्रेन- ट्रॅक्टर-ट्रॉलीची भीषण धडक, भयंकर आवाज अन् तुकडे हवेत उडाले, थरकाप उडवणारा VIDEO


