Vishwas Nangare Patil : आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक, 'आईची हाक पुन्हा कधी...'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Vishwas Nangare Patil Mother passes away : विश्वास नांगरे पाटील यांच्या मातोश्री श्रीमती मंगल नारायण नांगरे पाटील यांचं वृध्दापकाळाने निधन झालं आहे.
Vishwas Nangare Patil Mother Passes away : महाराष्ट्राचे तडफदार आयपीएस अधिकारी आणि तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेले विश्वास नांगरे पाटील यांच्या आईचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. विश्वास नांगरे पाटील यांच्या मातोश्री श्रीमती मंगल नारायण नांगरे पाटील यांचं वृध्दापकाळाने निधन झालं आहे. अशातच सांगलीतील शिराळा मतदारसंघाचे आमदार सत्यजीत देशमुख यांनी फेसबूक पोस्ट करत याची माहिती दिली. तर विश्वास नांगरे पाटील यांनी देखील आपल्या भावनाला वाट दाखवली आहे.
आईची हाक पुन्हा कधी ऐकायला...
मला माहित आहे आता आईची हाक पुन्हा कधी ऐकायला मिळनार नाही. पण तिने जोडलेल्या असंख्य ऋणानुबंधाचा गोडवा आजन्म रिता होणार नाही, असं विश्वास नांगरे पाटील फेसबूक पोस्टमध्ये म्हणाले. आमदार सत्यजीत देशमुख यांनी देखील पोस्ट करत दु:ख व्यक्त केलंय.
मंगलकाकी नांगरे पाटील आपल्यातून गेल्या...
advertisement
आज मन अत्यंत जड झालं आहे. आमच्या सर्वांच्या लाडक्या , माझे मित्र विश्वास नांगरे पाटील आणि विकास नांगरे पाटील यांच्या मातोश्री श्रीमती मंगलकाकी नांगरे पाटील आपल्यातून गेल्या. सकाळपासून मन अस्वस्थ होते. मी शिराळ्याला गेलो आणि का माहीत नाही वाटले कोकरुड ला जावे आणि मंगल काकीना भेटावे. मी तडक मागे फिरलो आणि परत कोकरुडला गेलो आणि थेट काकूंचा घरी गेलो. काकीना डोळे भरून पाहिले, त्यांची प्रकृती खूप खालावलेली, खूप काळजी वाटली. त्याना पाहून आज मला माझ्या आईची खूप आठवण आली, असं विश्वास नांगरे पाटील यांचे मित्र सत्यजीत देशमुख यांनी म्हटलं आहे.
advertisement
शून्य जो शब्दांनी भरता येत नाही...
मी परत शिराळ्याला गेलो आणि पाठोपाठ तीर्थरूप मंगल काकींची दुःखद बातमी समजली. खूप धक्का बसला.
जसं काय शेवटचे त्याना मला भेटायचे होते. अजून ही विश्वास बसत नाही. आई म्हणजे सर्वांचं मायेचं आभाळ असते, तिच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबाच्या हृदयात एक शून्य निर्माण होतो, असा शून्य जो शब्दांनी भरता येत नाही. काकींचा शांत स्वभाव, त्यांचे संस्कार, त्यांची निस्वार्थ माया…हे सगळं आयुष्यभर मला आठवणीत राहील. अशा माणसांचं जाणं म्हणजे फक्त निधन नाही. ती एक युगाची हळवी समाप्ती असते. ईश्वर त्यांच्या दिव्य आत्म्यास चिरशांती देवो. या कठीण प्रसंगातून कुटुंबाला धीर, आधार आणि सामर्थ्य मिळो, हीच मन:पूर्वक प्रार्थना, असं सत्यजीत देशमुख यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 17, 2025 9:46 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Vishwas Nangare Patil : आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक, 'आईची हाक पुन्हा कधी...'


