जामिनावर सुटला अन् बाहेर येताच व्यापाऱ्यासोबत केलं कांड, संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?

Last Updated:

Crime News : छत्रपती संभाजीनगरातील व्यापाऱ्याला जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीकडून सतत खंडणीच्या धमक्या देण्यात आल्या.''शूटर तयार ठेवला आहे'' अशा संदेशांमुळे व्यापारी घाबरला. तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत कारवाई सुरू केली.

किसी भी पुलिस चौकी में जा, तेरे लिए शूटर तैयार कर दिया
किसी भी पुलिस चौकी में जा, तेरे लिए शूटर तैयार कर दिया
‎छत्रपती संभाजीनगर : “किसी भी पुलिस चौकी में जा, तेरे लिए शूटर तैयार कर दिया…” अशी दहशत पसरवणारी धमकी येते म्हणजे एखादा सिनेमातला खलनायक आठवतो. पण छत्रपती संभाजीनगरात हा संवाद प्रत्यक्षात एका व्यापाऱ्याला संदेशाद्वारे पाठवला गेला. जामिनावर बाहेर आलेल्या एका सराईत गुन्हेगाराने व्यापाऱ्याला अशा पद्धतीने धमकावत खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांकडे तक्रार गेल्यावर तर त्याने पोलिसांनाच वचकवण्याचा प्रयत्न केला.
‎छत्रपती संभाजीनगरातील रेंगटीपुरा भागात राहणारे शेख शाहरूख शेख सलीम वय 30 हे व्यापारी आहेत. 27 ऑक्टोबर रोजी ते घराकडे जात असताना शेख रियाज शेख अनिस 25, रा. कटकट गेट या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने त्यांना अडवून “मैंने मर्डर किया है… पैसे नहीं दिया तो तुझे भी खत्म कर दूंगा” असे म्हणत 10 हजारांची मागणी केली. शाहरूख यांनी तक्रार नोंदवली नाही म्हणून त्याचा वेग अधिकच वाढला.
advertisement
‎पुढील काही दिवस आरोपीने व्यापाऱ्याच्या हालचालींवर पाळत ठेवून सतत मेसेजद्वारे धमक्या दिल्या. खंडणीची रक्कम 10 हजारांवरून थेट 50 हजारांपर्यंत नेली. दरम्यान, “तू कुठेही गेला तरी तुझ्यासाठी शूटर तयार ठेवला आहे” अशा संदेशांनी त्याने भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.शाहरूख यांनी सततच्या त्रासाला कंटाळून जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, ही तक्रार दिल्याचे समजताच रियाजने पोलिसांनाच फोन करून “वो बाहर मिलेगा, मैं देख लूंगा” अशी भाषा केली. व्यापाऱ्याला पुन्हा पुन्हा हत्येच्या धमक्या पाठवत राहिला.
advertisement
‎जिन्सी पोलिसांनी या गंभीर प्रकरणावर तातडीने कारवाई करत शुक्रवारी रियाजविरोधात खंडणी व धमकीचे गुन्हे दाखल केले. हा आरोपी काही दिवसांपूर्वीच हत्येच्या गुन्ह्यातून जामिनावर सुटल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, जामिनावर असतानाही तो पुन्हा धमक्या देत फिरत असल्याने त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
जामिनावर सुटला अन् बाहेर येताच व्यापाऱ्यासोबत केलं कांड, संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement