Arjun Tendulkar : मुंबई इंडियन्स सोडताना सचिनचा लेक भावूक, म्हणाला 'माझ्या सर्व आठवणी...'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Arjun Tendulkar message For Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने सचिनचा लेक आणि युवा क्रिकेटर अर्जुन तेंडूलकर याला लखनऊला ट्रेड केलं आहे. अशातच आता अर्जुनची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाली आहे.
Arjun Tendulkar On Mumbai Indians : आगामी आयपीएल सीझनपूर्वी मुंबई इंडियन्सने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरला लखनऊ सुपर जायंट्सकडे (LSG) ट्रेड केलं. त्यामुळे आता अर्जुन झहीर खानच्या मार्गदर्शनाखाली खेळेल. अशातच मुंबई इंडियन्स सोडताच अर्जुन तेंडूलकरने भावूक मेसेज सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मुंबई इंडियन्स तुम्ही दिलेल्या सर्व आठवणींबद्दल खूप खूप आभार... मुंबई इंडियन्ससारख्या संघाचा बॅज घालणं किंवा संघात सहभागी होणं हा माझ्यासाठी एक सन्मान आहे, असं अर्जुन तेंडूलकर म्हणाला आहे. अर्जुनचा हा नम्र स्वभाव अनेकांना भावलाय. आता अर्जुन लखनऊ सुपर जाएन्ट संघाकडून खेळताना दिसेल. त्यावर त्याने उत्सुकता व्यक्त केली. मी लखनऊ सुपर जाएन्ट संघाकडून खेळण्याची तयार आहे. सी यू सून, असं अर्जुनने पोस्टमध्ये लिहिलं आहे.
advertisement
advertisement
IPL 2023 मध्ये खेळलेल्या 4 मॅचमध्ये अर्जुनने एकूण 3 विकेट्स घेतल्या आणि फलंदाजीमध्ये 13 धावा केल्या. त्याची सर्वोत्तम गोलंदाजीची आकडेवारी 1 विकेटसाठी फक्त 9 धावा (1/9) होती, जी त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध केली होती. या कामगिरीमुळे तो चर्चेत आला होता. मात्र, 2024 च्या हंगामात त्याला केवळ 1 सामना खेळायला मिळाला.
advertisement
IPL 2024 मध्ये हा सामना लखनौ सुपर जाएंट्स (LSG) विरुद्ध होता आणि दुर्दैवाने या मॅचमध्ये तो एकही विकेट घेण्यात अपयशी ठरला आणि दुखापतीमुळे त्याला त्याची ओव्हर अर्धवट सोडून बाहेर जावे लागले. अशा प्रकारे, अर्जुनने आजपर्यंत IPL मध्ये एकूण 5 सामने खेळले असून त्यात 3 विकेट्स आणि 13 धावा अशी त्याची आकडेवारी आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 17, 2025 9:21 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Arjun Tendulkar : मुंबई इंडियन्स सोडताना सचिनचा लेक भावूक, म्हणाला 'माझ्या सर्व आठवणी...'


