Water Supply : छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीबाणी, घेण्यात येणार 6 दिवसांचा शटडाऊन, कारण काय?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत करणारे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने हाती घेतले आहे. तब्बल सहा दिवसांचा शटडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर : शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत करणारे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने हाती घेतले आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पैठण रोडवरील टाकळी फाटा येथे 2500 मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी जोडण्याचे काम सुरू होणार असून, त्यासाठी रविवारपासून तब्बल सहा दिवसांचा शटडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
सध्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 900 मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर हा शटडाऊन असल्याने पुढील काही दिवस पाणीपुरवठ्यात विलंब होणार आहे. पाणी वितरणात एक ते दोन दिवस उशीर होण्याची शक्यता महापालिकेने व्यक्त केली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विनंतीवरून हा खंडणकाळ (शटडाऊन) मंजूर करण्यात आला आहे.
गळती दुरुस्तीचे कामही होणार
शटडाऊनच्या कालावधीत ढोरकीन पंपहाऊस परिसरातील 900 मिमी जलवाहिनीला लागलेली मोठी गळतीदेखील दुरुस्त केली जाणार आहे. त्यामुळे या सहा दिवसांत मुख्य जोडणी आणि गळती दुरुस्ती ही दोन्ही महत्त्वाची कामे पूर्ण होणार आहेत.
advertisement
कमी क्षमतेने पाणीपुरवठा
शटडाऊनदरम्यान 700 मिमी आणि 1200 मिमी व्यासाच्या दोन लाईनवरूनच पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. मात्र उपलब्ध पाण्याचे प्रमाण केवळ 125 एमएलडीपर्यंत मर्यादित राहणार असल्याने शहरातील अनेक भागांमध्ये पाणी वेळेवर मिळण्यात अडचणी येतील.
या भागांना अधिक विलंब
view commentsचिकलठाणा, हनुमान टेकडी आणि विश्वभारती कॉलनी येथील जलकुंभांवरून होणारा पुरवठा अधिक उशिरा होईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी दिली. महापालिकेने नागरिकांना पुढील काही दिवस पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन केले आहे.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
November 17, 2025 9:56 AM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
Water Supply : छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीबाणी, घेण्यात येणार 6 दिवसांचा शटडाऊन, कारण काय?


