रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, हडपसर स्टेशनवरून सुटणार आता 2 गाड्या, पाहा वेळापत्रक
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
पुण्यातून धावणाऱ्या नांदेड आणि हडपसर या दोन गाड्या 26 जानेवारीपासून थेट हडपसर टर्मिनलवरून सुटणार आहेत.
पुणे: पुणे रेल्वे स्थानकावरील वाढता ताण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हडपसर टर्मिनलचा वापर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हडपसर टर्मिनलचे काम आता अंतिम टप्प्यात असून, ते पुढील एका महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या काही गाड्या टप्प्याटप्प्याने हडपसर आणि खडकी या स्थानकांवर वळवण्याची तयारी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात पुण्यातून धावणाऱ्या नांदेड आणि हडपसर या दोन गाड्या 26 जानेवारीपासून थेट हडपसर टर्मिनलवरून सुटणार आहेत. या बदलामुळे पुणे स्थानकावरील मोठ्या प्रमाणात ताण कमी होणार आहे.
हडपसर टर्मिनलला आता पुणे रेल्वे स्थानकाचा पर्यायी ठिकाण म्हणून विकसित करण्यात येत आहे. या ठिकाणची 90 टक्के कामे पूर्ण झाली असून, येथे नियमित आणि विशेष मिळून 12 गाड्या सुटणार आहेत. याशिवाय, 10 गाड्यांना येथे थांबा देखील देण्यात आला आहे. पुणे स्थानकाच्या रिमॉडेलिंग आणि विकासाच्या कामांमुळे काही गाड्या आता हडपसर आणि खडकी या स्थानकांवर वळवण्यात येत आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय टळणार आहे.
advertisement
रेल्वे प्रशासनाने आता काही गाड्यांचे प्रस्थान पुणे स्थानकाऐवजी हडपसर टर्मिनलवरून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात दररोज सुटणाऱ्या 17629/17630 हडपसर – हजूरसाहिब नांदेड हडपसर एक्स्प्रेस आणि 01487/01488 हडपसर – हरंगुळ दैनंदिन विशेष गाड्या समाविष्ट आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाहतूक सुरळीत चालण्यासाठी हा बदल करण्यात आला असून, रेल्वे प्रशासनाकडून याची माहिती देण्यात आली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 17, 2025 9:13 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, हडपसर स्टेशनवरून सुटणार आता 2 गाड्या, पाहा वेळापत्रक


