ONGCची गॅस पाइपलाइन फुटली, गळतीने संपूर्ण गाव धोक्यात; रात्री गॅस विहीर पेटली, भीतीचे वातावरण

Last Updated:

Fire Broke ONGC Gas Well: आंध्र प्रदेशातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील ONGCच्या मोरी-5 गॅस विहिरीवर गॅस गळतीमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. जीवितहानी टळली असली तरी आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासन आणि ONGCची पथके घटनास्थळी तैनात आहेत.

News18
News18
कोनसीमा: आंध्र प्रदेशातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील एका तेल-गॅस विहिरीवर सोमवारी गॅस गळतीमुळे आग लागल्याची घटना घडली. ही विहीर ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) साठी उत्पादनवाढीचे काम पाहणाऱ्या डीप इंडस्ट्रीज लिमिटेडकडून चालवली जात होती.
advertisement
प्राथमिक माहितीनुसार या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नाही, अशी माहिती ONGCच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. आगीची माहिती मिळताच राजमहेंद्रवरमधील ONGCचे वरिष्ठ अधिकारी तातडीने मोरी गावात रवाना झाले.
advertisement
ONGC अधिकाऱ्यांनी सांगितले की, मोरी-5 या विहिरीवर गॅस पाइपलाइनला गळती लागल्यानंतर आग भडकली. ही विहीर डीप इंडस्ट्रीज लिमिटेडकडून उत्पादनवाढीच्या (प्रोडक्शन एन्हान्समेंट) कामाअंतर्गत चालवली जात होती.
advertisement
advertisement
दरम्यान अग्निशमन विभागाचे अधिकारी बालकृष्ण यांनी ANI ला सांगितले की, माळकीपुरम मंडलातील इरसुमंदा गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली होती. स्थानिक नागरिकांनी याची माहिती ONGC अधिकाऱ्यांना दिल्यानंतर अग्निशमन दल, पोलीस आणि ONGCचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू असून, गावात भीतीचे वातावरण आहे.
advertisement
ONGCचे तांत्रिक पथक घटनास्थळी पोहोचले असून, परिस्थितीचा आढावा घेत गळतीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. कोनसीमा जिल्हा प्रशासनही घटनास्थळी उपस्थित असून, आग आटोक्यात आणण्यासाठी आणि पुढील धोका टाळण्यासाठी समन्वयाने कारवाई केली जात आहे.
महत्त्वाचे म्हणजे ONGCचा प्रोडक्शन एन्हान्समेंट कॉन्ट्रॅक्टर असलेल्या डीप इंडस्ट्रीज लिमिटेडला 2024 मध्ये आंध्र प्रदेशातील ONGCच्या राजमहेंद्रवरमधील अॅसेटसाठी 1,402 कोटी रुपयांचा कंत्राट मिळाले होते. संबंधित मोरी-5 विहीर गेल्या सुमारे एका वर्षापासून कार्यरत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
advertisement
घटनेबाबतची अधिक माहिती आणि तपासाचे निष्कर्ष येणे बाकी असून, प्रशासन आणि ONGCकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
ONGCची गॅस पाइपलाइन फुटली, गळतीने संपूर्ण गाव धोक्यात; रात्री गॅस विहीर पेटली, भीतीचे वातावरण
Next Article
advertisement
Neil Somaiya Dinesh Jadhav : सोमय्यांविरोधात वॉर्ड १०७ मधला गेम कसा फिरला? अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सांगितली Inside Story
सोमय्यांविरोधात वॉर्ड १०७ मधला गेम कसा फिरला? अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सांगि
  • बीएमसी वॉर्ड क्रमांक १०७ मध्ये एक मोठी राजकीय उलथापालथ दिसून आली.

  • नील सोमय्या यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे वाटत असतानाच, शिवसेना ठाकरे गटाने

  • ठाकरेंनी अपक्ष उमेदवार दिनेश जाधव यांना पुरस्कृत उमेदवार जाहीर करून सोमय्यांसमोर

View All
advertisement