पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार, समोर आलं मोठं कारण
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएकडून ओम बिर्ला यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीनेही आपला उमेदवार जाहीर केला आहे.
नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सत्ताधाऱ्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी विरोधीपक्षाला सहकार्य करावं असं देखील सांगितलं होतं. मात्र परिस्थिती काही वेगळीच दिसत आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठीची निवडणूक अटळ असल्याचं दिसत आहे.
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएकडून ओम बिर्ला यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीनेही आपला उमेदवार जाहीर केला आहे. इंडिया आघाडीकडून के.सुरेश यांनी अर्ज भरला आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक होणार असून कोण अध्यक्ष होणार याकडे लक्ष लागलं आहे.
बिनविरोध निवडणूक न होण्यामागे राहुल गांधींनी सांगितलं मोठं कारण
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी म्हणाले, "मल्लिकार्जुन खर्गे यांना केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचा फोन आला. राजनाथ सिंह यांनी खरगे यांच्याकडे त्यांच्या सभापतींसाठी पाठिंबा मागितला. आम्ही सभापतींना पाठिंबा देऊ, असे विरोधकांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
advertisement
#WATCH दिल्ली: कांग्रेस सांसद राहुल गांधी ने कहा, "मल्लिकार्जुन खरगे के पास केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह का फोन आया राजनाथ सिंह जी ने खरगे जी से अपने स्पीकर के लिए समर्थन मांगा, विपक्ष ने साफ कहा है कि हम स्पीकर को समर्थन देंगे लेकिन विपक्ष को डिप्टी स्पीकर मिलना, राजनाथ सिंह जी… pic.twitter.com/qMGumpw7qo
— ANI_HindiNews (@AHindinews) June 25, 2024
advertisement
विरोधकांना ते मिळणार नाही. डेप्युटीला पाठिंबा." सभापती मिलना, राजनाथ सिंह म्हणाले होते की आपण कॉल परत करू, आजपर्यंत पंतप्रधान मोदींना कोणतेही उत्तर मिळालेले नाही परंतु त्यांचे हेतू स्पष्ट आहेत. नाही. नरेंद्र मोदीजींना कोणतेही रचनात्मक सहकार्य नको आहे. विरोधकांना परंपरा कायम ठेवली तर पूर्ण पाठिंबा देऊ असे सांगितले.
Location :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
June 25, 2024 1:07 PM IST