2 वर्षांचं रिलेशन, एका पार्टीनं उद्ध्वस्त! भारतीय तरुणीने कोरियन लिव्ह इन पार्टनरवर केले सपासप वार, धक्कादायक कारण
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
गर्लफ्रेंडचा खूनी खेळ, कोरियन पार्टनरवर चाकूने सपासप वार, स्वत: हॉस्पिटलमध्ये नेलं अन्....दारूने सुरू झालेला वाद, दारूनेच संपवला! भारतीय तरुणीने कोरियन पार्टनरचा काढला काटा
ज्या दारुमुळे दोघांमध्ये वाद झाला वितुष्ट आलं त्याच दारुनं लिव्ह इन पार्टनरचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री दोघंही एकत्र दारू प्यायला बसले. भरपूर प्यायले. त्यांच्यात वाद झाला आणि त्याच रागातून भारतीय तरुणीनं आपल्या लिव्ह इन कोरियन पार्टनरवर चाकूनं सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बॉययफ्रेंडला पाहून तरुणी हादरली. तिने लगेच त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.
ग्रेटर नोएडाच्या सेक्टर १५० मधील एका उच्चभ्रू सोसायटीत लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडप्याचा रक्तरंजित अंत झाला. घरगुती वादातून संतापलेल्या एका तरुणीने आपल्या कोरियन बॉयफ्रेंडच्या छातीत चाकू खुपसून त्याची हत्या केली. धक्कादायक म्हणजे, मृत तरुण हा दक्षिण कोरियाचा नागरिक असून तो एका नामवंत मोबाईल कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होता.
नॉलेज पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एटीएस पायस हाईड वेज या सोसायटीमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डक ही यू आणि त्याची गर्लफ्रेंड लुंजेना पमाई (मणिपूरची रहिवासी) हे गेल्या काही काळापासून एकत्र राहत होते. रविवारी रात्री दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि त्याचं रूपांतर हाणामारीत झालं. संतापलेल्या लुंजेनाने घरातील धारदार चाकूने डक ही यू याच्यावर सपासप वार केले.
advertisement
तरुणीनं बॉयफ्रेंडला उपचारासाठी नेलं रुग्णालयात
या घटनेत सर्वात चकित करणारी बाब म्हणजे, रागाच्या भरात प्रियकरावर वार केल्यानंतर लुंजेना स्वतःच त्याला रक्ताच्या थारोळ्यातून बॉयफ्रेंडला उचलून ग्रेटर नोएडातील जिम्स रुग्णालयात घेऊन गेली. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच डक ही यू याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
advertisement
ग्रेटर नोएडा के सेक्टर 150 की सोसायटी में मणिपुर की युवती ने साउथ कोरिया के व्यक्ति की हत्या कर दी।
दोनों लिव इन रिलेशनशिप में थे, दोनों ने शराब पी और फिर विवाद में मणिपुर की लुंजेना ने साउथ कोरिया के डक जी को चाकू मार दिया।
डक मोबाइल कंपनी में मैनेजर था और 10 साल से भारत में… pic.twitter.com/6iiGA0oODK
— JIMMY (@Jimmyy__02) January 5, 2026
advertisement
दारूची पार्टी आणि बेदम मारहाण
पोलिसांनी लुंजेनाला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केली असता अनेक धक्कादायक खुलासा केला. लुंजेनाने पोलिसांना सांगितले की, "त्या रात्री आम्ही दोघे दारू पित होतो. डक ही यू हा दारूच्या नशेत मला सतत बेदम मारहाण करायचा. त्या रात्रीही त्याने माझ्याशी वाद घातला आणि मला मारले. मी त्याच्या त्रासाला कंटाळले होते. त्याला जीवे मारण्याचा माझा हेतू नव्हता, पण त्या क्षणी रागाच्या भरात माझ्याकडून ते झालं."
advertisement
पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असून सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज आणि घरातील पुराव्यांची तपासणी केली जात आहे. दक्षिण कोरियाच्या दूतावासालाही या घटनेची कल्पना देण्यात आली आहे. एका परदेशी नागरिकाची अशा प्रकारे हत्या झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
view commentsLocation :
Noida,Gautam Buddha Nagar,Uttar Pradesh
First Published :
Jan 05, 2026 2:52 PM IST
मराठी बातम्या/देश/
2 वर्षांचं रिलेशन, एका पार्टीनं उद्ध्वस्त! भारतीय तरुणीने कोरियन लिव्ह इन पार्टनरवर केले सपासप वार, धक्कादायक कारण










