120 च्या स्पीडने थार आली अन्...5 जणांचा जागीच मृत्यू, घटनास्थळावरचा पहिला VIDEO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Gurugram Delhi-Jaipur महामार्गावर Jharsa Flyover जवळ काळी Thar ओव्हरस्पीडमुळे अपघात; UP नोंदणीकृत गाडीत पाच मृत, एक जखमी, मेदांता रुग्णालयात उपचार.
पहाटेची शांतता आणि रस्त्यावर फार कुणी नाही म्हणून सुस्साट स्पीडनं धावणारी थार, अचानक असं काही घडलं की ज्यामुळे सहा लोकांचं आयुष्य एका क्षणात घडलं. ही धक्कादायक घटना पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास घडली. थारने एकदम स्पीड घेतला, ओव्हरस्पीड कधी झाला ते समजलंच नाही आणि अचानक एका क्षणात सगळं संपलं. ओव्हरस्पीडच्या नादात थार डिव्हायडरवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की बस्स. थारचा संपूर्ण चुराडा झाला.
थार कारमध्ये काही उरलंच नाही. संपूर्ण कारचा चक्काचूर झाला. या अपघातात गाडीतील सहापैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण अत्यंत गंभीर जखमी आहे. दिल्ली-जयपूर महामार्ग क्र. ४८ वर (NH-48) राजीव चौक एक्झिट (Exit 9) जवळ भरधाव वेगात असलेल्या एका थार कारचा भीषण अपघात झाला. ही धक्कादायक घटना गुरुग्राममध्ये घडली. या अपघातात गाडीतील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक तरुण गंभीर जखमी झाला.
advertisement
उत्तर प्रदेशातून काही कामानिमित्त हे तरुण गुरुग्रामला आले होते. काळरात्रीचा प्रवास त्यांच्यासाठी अखेरचा ठरला. सेक्टर-४० पोलीस स्टेशनचे एसएचओ ललित यांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेली ही काळी थार कार (क्रमांक UP नोंदणीकृत) झारसा फ्लायओव्हरजवळील एक्झिटच्या दुभाजकावर आदळली.
हा अपघात इतका भयानक होता की, गाडीवरील नियंत्रण पूर्णपणे सुटले आणि थार थेट दुभाजकावर आदळल्याने अक्षरशः चेंदामेंदा झाली. गाडीचा दर्शनी भाग पूर्णपणे निकामी झाला. या दुर्घटनेत तीन महिला आणि दोन पुरुष अशा पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला. सहावा प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याला गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
advertisement
Gurugram, Haryana: Five young men died and one was injured when a black Thar, carrying six passengers, lost control due to overspeeding and collided with the exit divider near Jharsa Flyover on the Gurugram-Delhi-Jaipur Highway at 4:30 a.m. The vehicle, bearing a UP registration… pic.twitter.com/c7oxWhUymp
— IANS (@ians_india) September 27, 2025
advertisement
वेगाची किंमत जीव देऊन चुकवली
पहाटेच्या वेळी वेगावर नियंत्रण न ठेवल्यामुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. निष्पाप तरुणांचा अचानक झालेला मृत्यू पाहून परिसरात शोककळा पसरली आहे. क्षणभराच्या चुकीमुळे एका क्षणात उद्ध्वस्त झालं. पोलिसांनी सगळे मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. जखमी व्यक्तीची चौकशी केली जाणार आहे.
Location :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
September 27, 2025 8:46 AM IST