IND vs SL : Super Over मध्ये राडा! शनाका रनआऊट झाला तरी बाहेर का गेला नाही? सूर्याने थेट अंपायरला धरलं, पाहा Video

Last Updated:

Dasun Shanaka Run Out Controversy : श्रीलंकेच्या डावातील चौथ्या बॉलवर दासुन शनाकाला अर्शदीप सिंगच्या बॉलवर कॉट-बिहाइंड आउट देण्यात आलं. अंपायरने बोट वर करताच, शनाकाने DRS घेतला.

Dasun Shanaka Run Out Controversy
Dasun Shanaka Run Out Controversy
India vs Sri Lanka Super Over : भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या रोमांचक सामन्यात टीम इंडियाने सुपर ओव्हरमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने श्रीलंकेला 20 ओव्हरमध्ये 203 धावांचं आव्हान दिलं होतं. पण श्रीलंकेने 202 रन्स केल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. या सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेला फक्त 2 धावा करता आल्या. त्यानंतर टीम इंडियाने पहिल्याच बॉलवर 3 धावा घेत विजय मिळवला. अशातच या सुपर ओव्हरमध्ये मोठा राडा झाल्याचं पहायला मिळालं. अंपायरच्या निर्णयाने मोठा वाद पेटल्याचं पहायला मिळालं.

नेमकं काय झालं?

श्रीलंकेच्या डावातील चौथ्या बॉलवर दासुन शनाकाला अर्शदीप सिंगच्या बॉलवर कॉट-बिहाइंड आउट देण्यात आलं. अंपायरने बोट वर करताच, शनाकाने DRS घेतला आणि धावण्याचा प्रयत्न सुरू केला. दरम्यान, त्याआधीच अलर्ट विकेटकीपर संजू सॅमसनने थेट स्टंप्सवर थ्रो मारून त्याला रन आउट केलं. भारताचे खेळाडू दुहेरी विकेट मिळाल्याच्या आनंदात होते, पण तिसऱ्या अंपायरने शनाकाला 'नॉट आउट' घोषित केलं.
advertisement

अंपायर फलंदाजाला 'आउट' देतो तेव्हा...

अंपायरने नॉट आऊट दिल्यानतंर सूर्याने थेट ऑन फिल्ड अंपायरला धरलं अन् नेमका विषय काय विचारला. अंपायर गाझी सोहेल यांनी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला नियम समजावून सांगितला. नियमानुसार (MCC Law 20.1.1.3), जेव्हा ऑन-फिल्ड अंपायर फलंदाजाला 'आउट' देतो, तेव्हा त्याच क्षणी बॉल डेड (Ball is Dead) होतो. त्यामुळे, कॉट-बिहाइंडचा निर्णय DRS मध्ये 'नॉट आउट' ठरला असला तरी, बॉल डेड झाल्यामुळे, त्यानंतर झालेला रन आउट ग्राह्य धरला गेला नाही.
advertisement

 पहिल्याच बॉलवर तीन धावा

दरम्यान, या रोमांचक मॅचमध्ये श्रीलंकेच्या पथुम निसंकाचे मॅग्निफिसेंट शतक (107 धावा) व्यर्थ ठरले. सुपर ओव्हरमध्ये भारताचा लेफ्ट-आर्म पेसर अर्शदीप सिंगने फक्त 2 धावा देत श्रीलंकेचे दोन गडी बाद केले. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पहिल्याच बॉलवर तीन धावा घेत भारताला दणदणीत विजय मिळवून दिला आणि आशिया कप फायनलमध्ये प्रवेश केला.
advertisement

पाहा Video

इरफान पठाणने सांगितला नियम

बॉल विकेटकीपर संजूने पकडल्यानंतर रिव्ह्यू घेण्यात आला आणि त्यामुळे बॉल डेड झाला आणि अंपायर गाजी सोहेल आपला मुद्दा टीम इंडियाला कळवतात. पण पहिला निर्णय नेहमीच मान्य असतो आणि जेव्हा अंपायरने तो आउट देतो तेव्हा बॉल डेड होतो आणि म्हणूनच शनाका रनआऊट होण्यापासून वाचला, असं इरफान पठाण याने म्हटलं आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SL : Super Over मध्ये राडा! शनाका रनआऊट झाला तरी बाहेर का गेला नाही? सूर्याने थेट अंपायरला धरलं, पाहा Video
Next Article
advertisement
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री, 'या' अभिनेत्यासाठी वेडी
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री असं का म्हणाली?
    View All
    advertisement